Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी बत्तासा गोल गोल

प — पाषाणभेद, Wed, 06/01/2011 - 04:31
मी बत्तासा गोल गोल तो: नको भांडण तंटा नको त्या बारा भानगडी नको झगडा करू अन नको कोणती लफडी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||धृ|| तो: लक्ष्मी आहे तू ग माझी अन नारायण मी ग तूझा शोभणारा जोडा आपला नाही संशय कसला त्याचा सारं गाव बोलेल ही फार गुणी आहे जोडी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||१|| ती: राग हो कसला प्रेम हे आहे माझे तुमच्यावर तुमची मी अन माझे तुम्ही झाले लग्न झाल्यावर उगाच नका राग कसला धरू आता तुम्ही मनी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे तुम्ही बत्तासा गोल गोल अन मी तुमची गोड रेवडी ||२|| तो: वागू नको आता बेगडी; ये ग थोडं लाडीगोडी करू थोड्या तडजोडी; लग्नाची पडली बेडी नवरा बायको दोघं ओढू या संसाराची गाडी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २९/०५/२०११

प्रतिक्रिया द्या
846 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा