Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जो तो येतो मारून जातो

प — पाषाणभेद, Wed, 06/01/2011 - 05:02
जो तो येतो मारून जातो जो तो येतो मारून जातो, जो तो येतो त्याला खेळून जातो, बोलत नाही गरीब बिचारा मुका तो तर तेव्हा करतो काय? जेव्हा बॉलला बॉलर लावतात थुका ||धृ|| तो हातात धरून जोरात चोळतात त्याला वरती फेकून खाली झेलतात पायी घासून घासून पायी घासून घासून रंग त्याचा जाईल बरका! ||१|| त्याला पकडाया सगळे पुढेच पळती हाती घ्यायला सारेच जोरात धावती सोडू नका हो कुणीही त्याला बोलती होणार्‍या धावा रोका ||२|| तो पहा बॉलरने बॉल आता बघा की हो टाकला बघा बॅट्समनने अस्सा फटका त्याला हो मारला जोरात फटका लागला त्याला जोरात फटका लागला हो त्याला पण सीमेपार जावू देवू नका ||३|| या मैदानी गवत किती किती तयार झाले त्यावर पाणी मारून मारून ताजे ताजे केले बॉल हळूवार आता हातळा बॉल हळूवार आता हो हातळा शेवटी रूप रंग त्याचे राखा ||४|| किती गुणाचा मानाचा गोल बॉल हा असतो त्याच्यावाचून क्रिकेट खेळ सुरू होतच नसतो विसरू नका कधीही त्याला विसरू नका हो कधीही त्याला त्याच्यासमोर तुम्ही एकदा झुका ||५|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०५/२०११

प्रतिक्रिया द्या
1191 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा