Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चिंब

अ — अज्ञातकुल, Tue, 06/07/2011 - 15:04
रानमाळी पावसाळी चिंब ओली पाकळी झाडपानी निथळणार्‍या चाहुलींच्या थेंबओळी मृत्तिकेच्या गर्भदेही अत्तरे घनबावळी रोमरोमांचा फुलोरा रासक्रीडा सावळी आडमेघांपलिकडे आतूर किरणे कोवळी सावलीच्या पाउली उमले कळी कळि वेगळी ओघळे मन ओघळांवर श्वास भरती पोकळी बंड काळिजपाखरांना पापणीकड मोकळी रम्य निर्मळ स्फटिकधारा जात त्यांची सोवळी स्पर्श होताक्षण धरेचा अर्घ्यमुद्रा ओवळी वाहतांना नांदती काठावरी स्वप्नावळी जीवनी ही सृजनतेची एक मोठी साखळी ...........................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
2616 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 06/08/2011 - 07:30 नवीन
हे तर फारच सुंदर आहे!! विशेषतः
मृत्तिकेच्या गर्भदेही अत्तरे घनबावळी रोमरोमांचा फुलोरा रासक्रीडा सावळी
व्वाह!! क्या बात!
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 06/08/2011 - 19:35 नवीन
शक्यतो कवितेच्या वात्याला जात नाही... पण ही कविता खुपच छान वाटली... धन्यवाद टू इजुभौ...
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 06/08/2011 - 19:44 नवीन
असेच म्हणते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
प
प्राजु Wed, 06/08/2011 - 20:06 नवीन
अप्रतिम कविता!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 07/06/2017 - 22:32 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Fri, 07/07/2017 - 07:05 नवीन
फारच छान. यातील प्रत्येक ओळीसाठी माझ्याकडे एक छायाचित्र आहे. वापरू का तुमच्या ओळी?
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Fri, 07/07/2017 - 07:10 नवीन
आडमेघांपलिकडे आतूर किरणे कोवळी Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा