पाककृती
रवा लाडू---
Primary tabs
साहित्य- दोन वाट्या जाड रवा, दोन वाट्या साखर, एक वाटी साजुक तुप, एक टे.स्पुन वेलदोडा पुड,
बेदाणे थोडे.
कॄती- प्रथम साजुक तुपावर रवा खमंग भाजुन घ्यावा, अगदी घरभर खमंग वास पसरला पाहिजे,आता तो थोडावेळ बाजूला ठेवा.
मग पाक करण्याची तयारी करा. एका पातेल्यात साखर घाला, ती बुडेल इतपतच पाणी घाला, पाक करण्यास ठेवा..एकतारी पाक झाला की त्यात भाजलेला रवा घाला,एक्त्र ढवळा नीट. बाजुला ठेवुन द्या.येताजाता ते
मिश्रण हलवत रहा..रवा घट्ट झाला..जरासा कोरडा झाला की त्यात वेलदोडा पुड मिसळा, पुन्हा एकजीव करा.
आणी आता लाडू वळायला घ्या..एक एक बेदाणा लावत लावत लाडू वळा..
मी आजच केले आहेत..पण अजुन लाडू वळले नाहीत ..त्यामुळे फ़ोटो उद्या टाकीन नक्की.
फोटूशिवाय प्रतिसाद मिळायचे नाहीत निवेदिता ताई!;)
ही माझी पाकृ http://www.misalpav.com/node/7988
उद्या फोटू नक्की टाक.
हो टाका फोटो लवकर :)
मस्त!! पण पाकृचा फोटो कधी मिळ्णार बघायला ताई ??
मीसुध्द्धा रेवतीप्रमाणेच नारळाचा चव घालून लाडू बनवते
मस्त पाकृ. लाडूत सुके खोबरे टाकले तर लाडू आणखी मस्त लागतात.
निवेदिता ताई, लाडू एकदम मस्त झालेत. तुमच्याकडून आणि रेवतीताईंकडून प्रेरणा घेऊन मी बनवून पाहिलेत. ओले नारळ तर मिळालेच नाही पण सुके खोबरे घालूनही मस्त लागतात.
हा बघा मी परवा बनवलेल्या लाडूंचा फोटो:
स्मिताजी, तुमच्या घरी जेव्हा येइन तेव्हा खाण्याच्या लिस्टात याचीही गणना करून टाकावी ही विनंती.....
लिस्टमध्ये याची गणना केली. तुम्ही केव्हाही या :)
छानच फोटू!
ग्रेट हां स्मिता!
छानच फोटू!...... स्मिता!
माझा फ़ोटो अपलोडच होत नाहीये...सो प्लिज समजून घ्या..
तसा स्मिताने एक फ़ोटो दिलाच आहे..
मी ओले खोबरे कीसून घालून केलेले, ते पण yummy झालेले ....