आता नाही ...
सुचते बरेच काही, पण लिहिणे होत नाही ...
दिसते बरेच काही, पण पाहणे होत नाही ...
छळते तुझीच साद, सखे पण येणे होत नाही ...
साठवले बरेच काही, पण देणे होत नाही ...
तुझ्या घरावरून सखे , हल्ली जाणे होत नाही
पूर्वीची ती युगुलगीते, आता गाणे होत नाही ...
स्वच्छंद मनस्वीतेने आता जगणे होत नाही
जाहलो भ्याड इतका आता मरणे होत नाही ...
💬 प्रतिसाद
(1)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 06/08/2011 - 11:58
नवीन
अगदी हेच झाले आहे आमचे सध्या!! असो.
बाकी तुमची कविता मस्तच जमलीये.
याला तोडच नाही. :)
- Log in or register to post comments