भंगलेल्या मनाचा अभंग
चित्त आणि वृत्ती
व्हावी एकरूप
अहंकार लोप
होवो माझा
देव आहे नाही
ठावे नसे मज
माझे हितगुज
मज पाशी
मीच मला केले
उभे न्यायालयी
आत्माराम होई
न्यायाधीश
अलिप्तता ऐसी
तैसी नाही सोपी
किती बहुरूपी
अंतरंगी
परी नाही आता
उपाव दुसरा
अखंड पहारा
चित्तावरी.....!!
💬 प्रतिसाद
(4)
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 06/08/2011 - 21:38
नवीन
मनाचा शोध मनानी घ्यावा
ईतरास सांगावा आत्मरूपी
गमे हे त्यास सज्जन मनाचा
मुळचाच जोही नसे पापी
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
गुरुवार, 06/09/2011 - 10:25
नवीन
काव्यरूपी प्रतिक्रिया सुंदर आणि समर्पक , धन्यवाद.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 06/09/2011 - 10:56
नवीन
छान!
भंगलेल्या मनाचा अभंग भंगलेल्या मनाला भिडला!
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 06/09/2011 - 15:25
नवीन
अप्रतीम.. खूप आवडले. :)
प्रतिसाद देण्यास भाग पाडणारी रचना!
येऊ देत अजून! :)
राघव
- Log in or register to post comments