Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(येस , वी आर...)

ध — धन्या, Fri, 06/10/2011 - 19:54
काल अगदी असंच मला तो नेसकॅफेवर कॉफी पिताना भेटला मी "मी पाटील" म्हणताच, "मी नातलग" काहीसं तो म्हटला माझं सारं बोलणं तसं अगदी पुर्णपणे ईंग्रजीतून चालू होतं तो मात्र मराठी आणि ईंग्रजी दोन्हींची काशी घालताना दिसला माझ्याच वयाचा, पण "सार्‍या जगाचं ओझं माझ्या खांदयावर" असं शब्दाशब्दाला भासवणारा, मला जरा तो आगाऊच वाटला पोरगा नक्कीच सुखवस्तू अन खात्यापित्या घरातला असावा "मोबाईल, गाडीचा" अभिमान त्याच्या चेहर्‍यावर होता साचला म्हटलं माझ्या मित्रा, तू तेविसाव्या वर्षी आयायटीचा प्रोफेसर हो अगदी त्या सिकंदरासारखं जिंकण्याची उर्मीही तुझ्यात असू दे "Confidence. हा पुर्वी नव्हता..." असं मात्र नको बोलू रे राजा "अहंकाराचा वारा न लागो..." आठव, ही अशी गुर्मी तुझ्यात नसू दे तो "आयडॉलीजीम" की असंच काहीसं म्हणाला, मला ते कळेचना पुढे बोलला, आम्ही मुक्त... आमचं पुर्ण विश्व घडवणार आम्ही छानच आहे की, पण... "ही जिद्द, धाडस होतं की पुर्वी?" म्हणत आधीच्या पिढयांच्या मेहनतीला, पायदळी तुडवणार का तुम्ही? कुठल्या तामिळनाडूच्या पोरीला हेड बॉडी शिकवलं असेल, नसेल तर फ्रँकनेसच्या नावाने अगदी बेंबीपासून शंख करत तो सुटला वाटलं, कधी वाचले असतील का याने मुक्तेचे "ताटीचे अभंग" ज्या चिमुरडीने ज्ञानाच्या जोरावर नामदेवाला गुरुचरणावर घातला म्हणावसं वाटलं लेका, तु नशिबवान आहेस, फेसबूक मिळतंय कितीतरी लेकरं अशी असतील, शंभरपानी वहीसाठी रडणारी म्हणे "आमची माध्यमांची जाण" संगणक, मोबाईल अजून काही गॅजेटची दुनिया तुझी, अशीही लेकरं आहेत रात्री उपाशी राहणारी जरी "पोरं पोरीं" च्या गोष्टी करत पौंगडावस्थेतच अडकला आहे तरी "कोहं" हा प्रश्न माझ्या त्या शहाण्या मित्रालाही पडला आहे. भल्याबुर्‍याचीही जाण असावी त्याला, निदान वाटत तरी होतं पण बहुतेक घोडा उगाचच पोक्तपणा दाखवल्यामुळे अडला आहे मी सर्वज्ञानी आहे असं भासवणार्‍या या छोटयाशा नामदेवाला देव नसेल तिथे पाय ठेव म्हणणारा एखादा गुरु भेटायला हवा तसा फार हुशार आहे तो, पुढे जाईल, काहीतरी करुन दाखवेलं फक्त त्याचा अहंकाराने काठोकाठ भरलेला घडा फुटायला हवा

प्रतिक्रिया द्या
5399 वाचन

💬 प्रतिसाद (36)
प
प्रभो Fri, 06/10/2011 - 19:59 नवीन
हुच्च्च!!!!! भारी झालीय कविता.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 06/13/2011 - 12:50 नवीन
फु ट लो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
छ
छोटा डॉन Fri, 06/10/2011 - 20:01 नवीन
छान आहे, मस्त आहे कविता. तुम्ही शिर्षक कंसात लिहले आहे म्हणुन विडंबन म्हणवे तर हे काव्य ओरिजनलच वाटत आहे आणि अगदी वास्तववादी झाले आहे. मजा आली :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 06/11/2011 - 03:44 नवीन
मस्तं जमलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विनायक पाचलग Sat, 06/11/2011 - 08:31 नवीन
प्रचंड आवडल .... ( खर खर सांगतो - अस एखाद काव्य जर का माझ्या लेखामुळे आले असेल , तर तेवढा बास आहे :) बाकी , चुका सुधारायला वेळ आहेच ...इथे गडबड कोणाला आहे ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रदीप Sun, 06/12/2011 - 09:18 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ग
गोगोल Fri, 06/10/2011 - 20:37 नवीन
जमलय. ईतक्या फास्ट कसं काय बुवा सुचलं?
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 06/10/2011 - 21:07 नवीन
.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 06/10/2011 - 21:27 नवीन
दाद दिलीच पाहिजे इतकं परखड लिखाण! सलाम!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/10/2011 - 21:32 नवीन
जबरदस्त!!! आपण महागुरू आहात! :) विडंबन नव्हेच.. हे काव्यच आहे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 06/12/2011 - 05:03 नवीन
खरेच आहे. धनाजीराव विनायकाचा लेख हे केवळ निमीत्त आहे. पुढल्या पिढीसाठी हे उत्तम काव्यांजन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
रेवती Fri, 06/10/2011 - 21:36 नवीन
छानच हो धनाजीराव! मूळ साहित्यप्रकार संपूर्ण वाचला नाहिये तरी हे विडंबन आवडले.;)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 06/11/2011 - 04:01 नवीन
सुंदर आहे मुक्तक.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 06/11/2011 - 05:46 नवीन
एक नंबर ! ! - टारझन कोच , आयडॉली जिम
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 06/11/2011 - 06:39 नवीन
मस्त लिहीलं बरं!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/11/2011 - 06:55 नवीन
मला काय यात विडंबन दिसलं नाय! कवितेत लिव्हलंय हेच वास्तव आहे. उलट मूळ लेख विडंबन होता की काय अशी पुसटशी शंका येतेय.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 06/11/2011 - 07:13 नवीन
धन्यवाद. लेखन मूळचे वाटते यात पावती आहेच. पण शीर्षकाला कंस टाकून जो संदेश दिलात त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 06/11/2011 - 07:30 नवीन
पण बहुतेक घोडा उगाचच पोक्तपणा दाखवल्यामुळे अडला आहे क्या बात है... :)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sat, 06/11/2011 - 08:38 नवीन
लेख अगोदर वाचल्यामुळे हे लिखाण वाचाताना संदर्भ लागत होते. शेवटच्या दोन कडव्यांचा सूर अब्राहम लिंकनने शिक्षकाला लिहीलेल्या पत्रासारखा वाटला. पण कविता योग्य उत्तर देऊन गेली.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Sat, 06/11/2011 - 10:38 नवीन
किती सुंदर व किती पटकन साधलत. विलक्षण आवडले.
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Sat, 06/11/2011 - 12:40 नवीन
व्वा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे
प
परिकथेतील राजकुमार Sat, 06/11/2011 - 10:54 नवीन
अप्रतिम !
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 06/11/2011 - 11:36 नवीन
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार... आशा करूया, आपल्या नाम्या यातून काही बोध घेईल... - धनाजीराव वाकडे आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझियां सकलां हरिच्या दासा ।।१।। कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संतमंडळी सुखी असो ।।२।। अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ।।३।। नामा म्हणे तया असावे कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ।।४।।
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 06/11/2011 - 13:54 नवीन
आशा करूया, आपल्या नाम्या यातून काही बोध घेईल... खिखिखि.. गंमत पहा... वरती ते म्हणतात ," त्यांच्या लेखामुळे तुम्हाला कविता सुचली , चुका काय नंतर बघू...." वाकडेसाहेब पालथ्या घड्यावर पाणी.... यावरून एका जालीय काकांनी यांना दिलेल्या काही " जालीय सल्लासेशनांची" आठवण झाली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्रदीप Sun, 06/12/2011 - 09:22 नवीन
नाम्याने हे कमीत कमी वाचण्याची कृपा तुमच्यावर केली तर तेव्हढ्यावरच आनंद माना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मितभाषी Sat, 06/11/2011 - 11:43 नवीन
अगागागा धनाजीराव. मान गये. :) अहंकार नाही सोडला तर हा चांग्या १४०० वर्षाचा झाला तरी कोराच रहानार. GO KISS THE WORLD NO EGO GO EGO LO ENO भावश्या पाचगळ.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sat, 06/11/2011 - 13:34 नवीन
प्रचंड आवडले !
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 06/12/2011 - 04:36 नवीन
लई भारी याचा काही चांगला परिणाम झाला तर श्री. धनाजीरावांना माझ्यातर्फे एक प्यार्ती लागु.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/12/2011 - 09:41 नवीन
मस्त........! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Sun, 06/12/2011 - 16:29 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/13/2011 - 06:30 नवीन
मारा लेकिन कितना सॉल्लिड मारा नै? ____/\____
  • Log in or register to post comments
च
चेतन Mon, 06/13/2011 - 08:39 नवीन
मुक्तक मस्तच झालयं या मुक्तकावरुन कोणाला नवीन म्हणायचे आणि कोणाला जुना या विचारात पडलोय. ;) असो चेतन
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 06/13/2011 - 09:29 नवीन
छानच हो धनाजीराव! मूळ साहित्यप्रकार संपूर्ण 'वाचवला गेला' नाहिये तरी हे विडंबन आवडले.Wink प्यारे व ती ;) (रंगांची क्षमा मागून)
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Mon, 06/13/2011 - 10:25 नवीन
__/\_____/\_____/\_____/\_____/\_____/\___ __/\_____/\_____/\_____/\_____/\_____/\___
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 06/13/2011 - 10:52 नवीन
विडंबन नक्कीच नाही. मी सर्वज्ञानी आहे असं भासवणार्‍या या छोटयाशा नामदेवाला देव नसेल तिथे पाय ठेव म्हणणारा एखादा गुरु भेटायला हवा तसा फार हुशार आहे तो, पुढे जाईल, काहीतरी करुन दाखवेलं फक्त त्याचा अहंकाराने काठोकाठ भरलेला घडा फुटायला हवा एक नंबर ! बेष्ट !! -- सल्लाराम वाटणे
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Mon, 06/13/2011 - 11:29 नवीन
वाकडे साहेब, तुम्हीतर खुप सरळ-सरळ परखड आहात :-) मी सर्वज्ञानी आहे असं भासवणार्‍या या छोटयाशा नामदेवाला देव नसेल तिथे पाय ठेव म्हणणारा एखादा गुरु भेटायला हवा तसा फार हुशार आहे तो, पुढे जाईल, काहीतरी करुन दाखवेलं फक्त त्याचा अहंकाराने काठोकाठ भरलेला घडा फुटायला हवा अप्रतिम कविता / मुक्तक !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा