हायकू १
हायकू १
एक फुलपाखरू दगडावर बसलं
मनात म्हणालं
कसं फसवलं
मातीमधली ढेकळं काळी
पिवून पावसाचं पानी
व्हत्यात मातीवानी
कुकुचकु कुकुचकु
कोंबडा ओरडतोय कुकुचकु
तेच आहे का त्याचे हायकू?
दरीच्याच काठावर
घसा खरडून ओरडतोय
माझाच आवाज परत येतोय
सांजचा सुर्य
क्षितीजावर बुडला
किनार्यावर दगड रडला
हिरवे रान हिरवेगार
पाउस नव्हता तर
पिवळेशार पिवळेशार
समाधी लागावी म्हणून
डोंगरावरचे देवूळ
अंधारात जाते बुडून
पाखरांचा थवा पोटासाठी
सकाळी घरट्यातून उडतो
सायंकाळी परत येतो
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०६/२०११
💬 प्रतिसाद
(4)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/12/2011 - 08:52
नवीन
हायकू आवडले. दोन ओळीनंतर तिस-या ओळीत काही तरी वेगळं असलं पाहिजे असे वाटले. काही ओळी छान आहेत. काहींना जरा वेळ दिला पाहिजे असे वाटले. :)
खालच्या ओळीत काही असं वेगळेपण वाटत नाही.
पाखरांचा थवा पोटासाठी
सकाळी घरट्यातून उडतो
सायंकाळी परत येतो
बाकी, सांजचा सूर्य, हिरवे रान हिरवेगार, आणि समाधी लागावी म्हणून हे हायकू आवडले.
अजून येऊ दे..........!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 06/13/2011 - 08:12
नवीन
मस्त उतरलीये कविता...बाकी हायकु हा प्रकार,हल्ली फारसा पाहाण्यात वाचण्यात येत नाही...तो आज मिळाला म्हणुन बरही वाटलं...
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Mon, 06/13/2011 - 16:22
नवीन
वा! मस्तच, चुटचुटीत.
- Log in or register to post comments
न
निवांत पोपट
Mon, 06/13/2011 - 16:42
नवीन
तिसरी हायकू भारी आहे. त्यातून पुर्ण अर्थ निघतो.बाकीच्या मात्र ….….
कुकुचकु ,कुकुचकु ……वाटतात. (ह.घे.)
- Log in or register to post comments