Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पर्सनल अकाऊंट

अ — अत्रुप्त आत्मा, Mon, 06/13/2011 - 08:06
खरच...?मी आहे स्वतंत्र?... की,मी मालक आहे,एका बंद खोलीचा?॥ आपल्याच भींती,आपल्याच खिडक्या... आपलीच दारे,आणी कुलुपही आपलेच... प्रश्न आहे,हे सर्व उघडण्यासाठी लागणाय्रा चावीचा। आत राहायचे,निवारा हवा म्हणुन... आणी प्रेमाची माणसे असावी म्हणुनही... पण माणसं असुनही प्रेम नसेल,तर कुठुन कौल घ्यावा विवेकाचा?। कंटाळुन,वैतागुन मी बाहेर जातो,माळरानावर हुं-दडण्यासाठी... पण पुन्हा परतण्याची ओढ का लागते?... काळ येउन ठेपलाय,हे सगळं एकदा तपशिलवार शोधण्याचा। आजकाल मी समजतो,ही खोली आपलं पर्सनल अकाउंट आहे... आणी आपला हिच्याशी...मरेपर्यंत एक बाँड आहे... खरा मार्ग आहे,तो अकाउंट एक्टिवेट ठेवण्याचा। पराग दिवेकर...

प्रतिक्रिया द्या
2063 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 06/13/2011 - 08:18 नवीन
छान मुक्तक आहे. फक्त एक प्रश्नः
माळरानावर हुं-दडण्यासाठी...
यात हुं आणि दडण्यासाठी हे वेगळ का केले? नाही यात काही कोटी असेल तर त्याचे प्रयोजन कळले नाही. माफ करा पण बहुतेक माझी आकलन शक्ती कमी पडत असेल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/13/2011 - 11:08 नवीन
''हुं-दडण्यासाठी" असं लिहिलं,कारण...आपण बय्राच वेळा,परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी वेगळी वाट हुडकतो.पण नंतर कळतं,की आपला पर्याय फक्त दडुन बसायच्याच उपयोगाचा आहे,आपण शोधलं ते उत्तर खंरं नव्हे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
प
पाषाणभेद Mon, 06/13/2011 - 08:23 नवीन
खोलीचे पर्सनल अकांउंट असणं चांगली कल्पना आहे, पण त्यात ब्रांचमॅनेजरही असावा अशीही आमची मागणी आहे. म्हणजे दररोज सेव्हींग करता येतं.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/13/2011 - 10:59 नवीन
ग्रेट सजेशन...मी प्रयत्नात आहे...थांकू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पाषाणभेद Mon, 06/13/2011 - 11:08 नवीन
अर्थात किती ब्रांचेस असाव्यात याला मात्र आडकाठी नाही. आपापल्या जबाबदारीवर नवनवीन ब्रांचेस उघडाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/13/2011 - 11:19 नवीन
एकच बरी....एवढ्या उघडुन त्या चालवायच्या कुणी...आपली नाही बुवा तेवढी ताकद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा