Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस

स — सोनल कर्णिक वायकुळ, Tue, 06/14/2011 - 19:43
तू तिथे डोंगरांच्या कुशीत ढगांच्या गोधडीत स्वतःला लपेटून पहुडलेला आणि मी इथे कासावीस , उघड्या मोकाट वा-याने गुदमरलेला. तू तिथे झाडा फुलांच्या कानाशी अलगद हुळहुळत त्यांना खेळवणारा आणि मी इथे वैशाखाच्या उष्ण झळांशी भर दुपारी झटपटणारा तू तिथे एकेक गुपित उलगडत पालटून टाकतोस रंग सारा मी इथे जपत राहतो लपत राहतो बंद कुपीत झाकत स्वतःला मला भिजवण्याचा जीवापाड आटापिटा व्यर्थ जातोच हे माहित असताना का असा वागतोस माहित नाही. हे तुझ चिडवण खिजवण कि अजून काही? माहित नाही की पोटच्या सगळ्या मायेनिशी माझ्यावर बरसल्या नंतर माझ्या शुष्क डोळ्यातलं आटलेल पाणी स्वतःच्या डोळ्यात शोधतोस? माहित नाही

प्रतिक्रिया द्या
1433 वाचन

💬 प्रतिसाद (4)
आ
आत्मशून्य Tue, 06/14/2011 - 20:30 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/15/2011 - 10:26 नवीन
नि:शब्द.. अप्रतिम.. सुंदर. आणि काय काय म्हणू..? क्या बात.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 06/15/2011 - 10:33 नवीन
असेच म्हणतो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गणेशा Wed, 06/15/2011 - 14:02 नवीन
निशब्द
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा