Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Wed, 06/15/2011 - 10:31
काळ्याभोर मेघांची नभात दाटी असावी तुझ्या डोळ्यात मी भिजावे अन् तू माझ्या नसानसात भिनावी गडगडते ढग तुटून एकच सर अशी बरसावी त्यांनी माझ्या मनाची दशकांची तहान शांतवावी माझ्या देहाच्या वृक्षावरील अवघी पाने चिंब होऊन ओघळावी त्याच वृक्षाला लिपटलेल्या लाजाळूप्रमाणे तू मोहरून मिटावी कृष्णरंगी मेघांमागून सूर्याने सप्तरंगी किरणांची जाळी पसरवावी सांजेमागून येणारी अवनीही त्यावर लुब्ध होऊन थबकावी आता जरा पाऊस रिमझिम व्हावा अन् कडाडती विजही थकावी तुझे हात माझ्या हातात असावे अन् नजरेत नजर गुंतावी रिमझिम झालेल्या पावसात चिंब होऊन तू गोडगोड व्हावी माझ्या उबदार मिठीत येताच हलके हलके विरघळावी झरझरणार्‍या घनांच्या छिडकाव्याने अवघ्या रानातील माती ओलावी तशीच डबडबलेली तुझी देहकुपी माझ्या हृदयात अलगद लवंडावी |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१५/०६/२०११)

प्रतिक्रिया द्या
1814 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ग
गवि Wed, 06/15/2011 - 10:47 नवीन
अरे वा. एकाच नावाच्या आणि दोन वेगवेगळ्या मूडच्या पाऊसकविता एकत्र वाचायला मिळाल्या. तू आणि सोनल मिपावरचे उभरते काव्यसितारे आहात. लगे रहो.
  • Log in or register to post comments
व
विदेश Wed, 06/15/2011 - 12:28 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
र
रुमानी Wed, 06/15/2011 - 13:38 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 06/15/2011 - 14:00 नवीन
मस्तच एकदम
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 06/15/2011 - 14:08 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Sat, 06/18/2011 - 12:41 नवीन
एकदम झक्कास ...पाऊस
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा