Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती

ग — गणेशा, गुरुवार, 06/16/2011 - 14:25
रानातली वाट.. एक न संपणारा परिघ -२ कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती गच्च ओल शिवार.. फुललेली कांती हिरव्या पात्यावर,. मोत्यांची नक्षी पांढर्‍याफटुक ढगांची रेशमी दुलई काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती बांधावर उभी कोवळी रानजाई नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रीती कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती || झिम्माड गर्द रानात.. टिफण चालती सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची ------------- शब्दमेघ ( १६ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ) १. आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक ३. टिपुर आशेचं दाणं

Book traversal links for काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती

  • ‹ आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
  • Up
  • टिपुर आशेचं दाणं ... रानातली वाट...... ›

प्रतिक्रिया द्या
4027 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
पप्पु अंकल गुरुवार, 06/16/2011 - 15:05 नवीन
..................पण अजुन काहीतरी हवय !
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 06/16/2011 - 17:05 नवीन
शीर्षक वाचून गविंची खव आठवली.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ गुरुवार, 06/16/2011 - 17:45 नवीन
गणेशा -खूप छान कविता. आवडली.अगदी मनापासून. कविता वाचून मन भरून गेले. खूप शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई गुरुवार, 06/16/2011 - 19:05 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 06/17/2011 - 04:18 नवीन
फारच छान झाली आहे कविता.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 06/17/2011 - 05:38 नवीन
मस्त कविता आहे.... पहिली दोन कडवी कोराईगडावर फिरताना तयार केली असावीस असं वाटतं. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 06/17/2011 - 05:48 नवीन
+१ असेच म्हणतो. सुरुवातीला वाचताना झटकन कोरीगडच डोळ्यांसमोर येउन गेला. सुरेख कविता रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
न
नगरीनिरंजन Fri, 06/17/2011 - 07:34 नवीन
वा! पावसाचा परिणाम फार झालेला दिसतोय कवी लोकांवर!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 06/17/2011 - 08:35 नवीन
अहो ननि, पावसाचा परिणाम प्रत्येक संवेदनशील माणसावर होतच असतो, कविला व्यक्त करता येतो, इतकेच!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Fri, 06/17/2011 - 08:55 नवीन
हो. अगदी बरोबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 06/17/2011 - 08:34 नवीन
पांढर्‍याफटुक ढगांची रेशमी दुलई काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती बांधावर उभी कोवळी रानजाई नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रीती
क्या बात! क्या बात!! जियो!! वाचनखुण साठवलेली आहे!! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/17/2011 - 08:38 नवीन
सुंदर..!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/17/2011 - 09:44 नवीन
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासुन आभार
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Sat, 06/18/2011 - 12:36 नवीन
सुरेख कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा