Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सांग सखे ...

व — विश्वेश, Mon, 06/20/2011 - 08:30
झालीस मोगरा तू अशी वासंतिक वयात बहरताना झालो सुवास मी हि तुझिया आसपास फिरताना .... सरला काळोख आयुश्यि तुझा सूर्य उगवताना उमलले अंगांग माझे सखे, तुझे सुर्यफुल होताना ... मन भाळले इतके सहज लडिवाळ तुझ्या शब्दांना मोहरलो सावलीत तुझ्या अस्तित्व माझे संपताना .... धरलास हात माझा अन विसरलो वाट चालताना खंतले न मन तुझे जराही तो असा अचानक सोडताना .... टाळले होतेस सगळे सहज जर मला एकटे सोडताना का पाहिले होतेस मग वळून? सासुराला जाताना .... सांग सखे ... आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना .... - विश्वेश

प्रतिक्रिया द्या
1829 वाचन

💬 प्रतिसाद (10)
श
शैलेन्द्र Mon, 06/20/2011 - 08:45 नवीन
"आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना ...." छान आहे..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/20/2011 - 09:39 नवीन
आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना व्वा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 06/20/2011 - 09:02 नवीन
मस्त झालीये!! आवडली!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 06/20/2011 - 12:55 नवीन
कविता अतिशय आवडली.... मस्तच सहज .. माझी जुनी पहिली कविता आठवली...
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Mon, 06/20/2011 - 14:48 नवीन
कविता आवडली. "वासंतिक वय ?" ;) ... वयाचं वासंतिक हे विशेषण मला नव्याने माहीती झालं.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 06/21/2011 - 07:23 नवीन
भावनावोंको समझो !!! तुझ्या आठवणीत सखे साजणे एकदा मी एक कविता लिहिली तिचा रसिकांनी आस्वाद घ्यावा म्हणूनच ती संस्थळाला वाहिली सखी मोगरा, मी त्याचा सुवास "वसंत" होता, अन सूर्यही होता मोहरून जावे सार्‍या रसिकांनी असा शब्द माझा लडीवाळ होता तू मला सोडून गेल्याची वेदना काहींचे ह्रदय पार भेदून गेली "अरेरे" म्हणाले हे रसिक हळवे व्यथा माझी संवेदना छेदून गेली परी असती काही तिथे अरसिक अंगी जणू "नाना" कळा तयांच्या शब्द्च्छल मांडला तव तयांनी प्रतिसाद न मिळो लेखा तयांच्या हलकेच घ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना बेरके
प
प्राजु Mon, 06/20/2011 - 18:41 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 06/21/2011 - 06:56 नवीन
आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना .... अरेरे... असो... कविता झक्कास आहे !!!
  • Log in or register to post comments
र
रुमानी Mon, 06/27/2011 - 07:23 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 06/27/2011 - 11:44 नवीन
मस्त! प्रेमभंगाच्या सदाबहार विषयावरची ताजी कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा