Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वेगळी माझी खोली

क — काव्-काव्, Tue, 06/21/2011 - 12:11
बाबंकडे हट्ट करून घेतली वेगळी माझी खोली आतातर मी मोठा झालो, ४ वर्ष पूर्ण झाली दंग-मस्ती करतो, ठेवतो खेळणी पसरून सारी एकटे खोलीत राहण्याची, मजाच काही न्यारी वेगळी माझी खोली, वेगळी माझी कॉट माझे छोटेसे कपाट, असा माझा थाट छोटीशी खिडकी, त्याला छोटेसे दार थोडे दार उघडले, तर वारा येतो फार मी माझ्या खोलीत मोठ्या ऐटीत राहतो संध्याकाळी दुध पिताना खिडकी बाहेर पाहतो काऊ करतो कावकाव, चिऊ गोड गाणे गाते खारुताई मारते उडी, तेव्हा खूप मजा येते बागेत खेळून घरी येताच मी माझ्या खोलीत येतो रात्री जेवण होताच माझ्या कॉटवर झोपू पाहतो मला झोपच येत नाही, रात्री थंडी पडते गार किर्र काळोख होतो, मला भीती वाटते फार एकटाच बडबड करता करता एकदम घाबरून जातो मग लगेच पळत पळत, मी बाबाच्या खोलीत येतो डोक्यावरून पांघरून घेऊन, झोपतो बाबाच्या कुशीत चांदोमामाची गोष्ट ऐकत झोपी जातो खुशीत

प्रतिक्रिया द्या
1642 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ग
गणेशा Tue, 06/21/2011 - 16:49 नवीन
छान कविता ... आवडली
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 06/21/2011 - 17:08 नवीन
हा हा. मस्त आहे गाणे.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 06/21/2011 - 17:41 नवीन
बालगीतं वाचून बरीच वर्षे झाली होती .या गाण्याला चाल लावली असेल तर ते पण मिपावर अपलोड करावे.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 06/22/2011 - 19:50 नवीन
हा हा हा.. मस्त! या गाण्याला चाल लावली असेल तर ते पण मिपावर अपलोड करावे. खरंच करा. चालीवर ऐकायला मजा येईल! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/23/2011 - 08:17 नवीन
मस्त..! अवांतर - आपला आयडी मला फारच आवडून गेला..मस्तच आहे, वेगळा आहे! जियो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा