Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भास..

र — राघव, Tue, 06/21/2011 - 14:05
गंधासवे श्वास पुलकीत होती.. उरी मोगर्‍याचे उसासे.. नव्याने! "आषाढ येईल लवकर तसाही.." निवळत्या धरेला दिलासे नव्याने! नको तेच पुन्हा-पुन्हा का दिसावे? (कशाला जुने दु:ख सलते नव्याने?) जाणिव नाही कशी जाणिवेला.. अवचित पुन्हा भास होती नव्याने! पणतीस नाही तमा काळोखाची.. तमाचीच काया उजळते नव्याने! अरे..कल्पनांचे खुजे विश्व माझे.. शब्दांस स्वरसाज चढती नव्याने राघव

प्रतिक्रिया द्या
3993 वाचन

💬 प्रतिसाद (15)
ग
गणेशा Tue, 06/21/2011 - 16:46 नवीन
सुंदर गझल... अवांतर : 'तमाचीच काया' अर्थ कळला नाहि. सांगाल काय ?
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 06/22/2011 - 09:36 नवीन
तम.= अंधार.. पणतीच्या प्रकाशाने अंधाराचीच काया परत उजळतेय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/21/2011 - 18:17 नवीन
मार डाला...शेवटची २ कडवी तर अतीशय सुंदर... होती रहे शायरी,पढते रहेंगे हम कभी कभी मिलता है, ऐसा दर्दो गम
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 06/21/2011 - 18:56 नवीन
पणतीस नाही तमा काळोखाची.. तमाचीच काया उजळते नव्याने! व्वा! सुंदर गझल. राघव - बर्‍याच दिवसांनी टाकलीय कविता/ग़झल. अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 06/21/2011 - 19:17 नवीन
एकच अनुभव नव्याने येण्याचे अनेक पैलू छान हाताळले आहेत. 'तमा' वरचा श्लेष आवडला. अवांतर: कवितेची विडंबनं होणार राव... 'जुन्या दारवेचे नव्या बाटलीतुन पुन्हा पेग भरले जरासे नव्याने' वगैरे...
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Mon, 06/27/2011 - 17:29 नवीन
'तमा' वरचा श्लेष आवडला. संपुर्ण गझलच जमुन आलीये मस्त लयीत.. आवडली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
प्राजु Tue, 06/21/2011 - 20:44 नवीन
काय राघव राव!! बरेच दिसांनी आलासा!! :) मस्त जमलिये कविता!
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 06/22/2011 - 09:44 नवीन
सुंदर गझल..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 06/22/2011 - 10:42 नवीन
सुंदर गझल!! कोणते वृत्त?
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 06/22/2011 - 14:54 नवीन
तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. पण ही गझल नाही.. धाटणी जरी थोडी तशी असली तरीही रूढार्थानं गझल म्हणणे योग्य नाही. :) बाकी वृत्त वगैरे मला खरोखरच कळत नाहीत. त्यामुळे त्याबद्दल जाणकारच सांगू शकतील. राघव
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 06/22/2011 - 15:35 नवीन
सुंदर रचना!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 06/23/2011 - 14:43 नवीन
फार सुंदर पणतीस नाही तमा काळोखाची.. तमाचीच काया उजळते नव्याने! व्वा व्वा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/23/2011 - 15:10 नवीन
भासे गजल परि आहे कविता ओळींमधून मोद देते नव्याने! -रंगा
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 06/24/2011 - 11:08 नवीन
पुनःश्च धन्यवाद! :) राघव
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 06/24/2011 - 12:28 नवीन
खूप दिवसांनी इथे आले, तुमची कविता लगेच वाचली.. छान आहे.. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती गझल नाही आणि मला वाटतं कुठले वृत्त पण नाही . पण छान आहे रचना..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा