अंतीम क्षण (गझल)
हि माझी पहिलीवहिली गझल!! परिपूर्ण नाहीये पण गझल म्हणता येईल इतपत गणित जमले आहे.
{ वृत्त – आनंदकंद || गण - गागालगा लगागा गागालगा लगागा}
अंतीम क्षण
सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
वारे तसेच होते जाळून जे जळाले
केसांतल्या फुलांची गंधीत माळ आहे
पाठीवरून त्यांचे संपृक्त हे गळाले
आहेत हे मनाचे सारेच 'कां' अतृप्त
डोळ्यातल्या जळाला ओठात हे कळाले
सारे कसे सुखाचे रेशीमगान गाती
मी छेडता तराणे अश्रूच का ढळाले
बोलून घे तरीही त्यांना असो निराशा
मार्गात ते अडूनी सांगा कसे वळाले
गोळा करीत आलो संगे सवंगडी मी
अंतीम या क्षणाला सारे कुठे पळाले
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२२/०६/२०११)
💬 प्रतिसाद
(10)
प
पियुशा
Wed, 06/22/2011 - 11:35
नवीन
मस्त आहे
आवड्ली
:)
- Log in or register to post comments
प
पप्पु अंकल
Wed, 06/22/2011 - 17:15
नवीन
वृत्त सांभाळुन लिहीणारा म्हण्जे महाडिक टिचर चा विद्याथ्री कि काय ?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 06/23/2011 - 10:21
नवीन
नाहि आवडली ...
प्रयत्न छान आहे.
लिहित रहा.. वाचत आहे...
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Fri, 06/24/2011 - 07:00
नवीन
आवडली.
याचा अर्थ नीट समजला नाही.
इथे देखील दुसर्या ओळीचा अर्थ नीट समजला नाही. 'संपृक्त' हे तर विशेषण आहे ना?
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Fri, 06/24/2011 - 07:50
नवीन
अक्षरशः पारणे फेडणारे लीखाण.....
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sat, 06/25/2011 - 08:00
नवीन
वृत्तात लिहीण्याचा प्रयत्न अत्यंत स्पृहणीय आहे. पहिल्या दोन द्विपदींमध्ये अर्थ कळत नाही आणि काही काही ठिकाणी वृत्तासाठी शब्दांची मोडतोड झाली आहे उदा. ढळले ऐवजी ढळाले.
हे टाळले असते तर अप्रतिम गझल झाली असती. वृत्त आणि आशय दोन्ही व्यवस्थित सांभाळण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत हे पाहून छान वाटले. प्रकाशित करण्याची घाई न करता वारंवार संस्करण केल्यास उत्तम कविता निर्माण होतील अशी खात्री आहे.
- Log in or register to post comments
र
राघव
Sat, 06/25/2011 - 08:59
नवीन
काही कल्पना छान आहेत.
वर निरंजन म्हणतात तसे आणिक संस्कार झाले पाहिजेत. आपणच आपल्या कल्पनांवर अन्याय केल्यासारखे कधी होवू नये.
पु.ले.शु. :)
राघव
- Log in or register to post comments
A
ajay wankhede
Sun, 06/26/2011 - 14:51
नवीन
छ्यान...
आवडलं
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 06/27/2011 - 10:25
नवीन
क्या बात..क्या बात..क्या बात..!!!!!!!!
वंडरफुल..
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 06/27/2011 - 14:12
नवीन
सर्व मार्गदर्शक सूचनांची नोंद घेतली आहे.
सर्वांचे खुप खुप धन्यवाद!!
- Log in or register to post comments