तो पूर पावसाचा -
तो पूर पावसाचा डोळ्यांत साठलेला
प्रेमात भंगता मी डोळ्यांत दाटलेला |१|
आकाश भार झेले लाखो पतंग उडता
माझा पतंग दिसतो तो खूप फाटलेला |२|
लाभात खूप आता व्यवहार येथ झाले
व्यवहार नेमका का माझाच घाटलेला |३|
माझ्या मनांत घुसले तव वार पापण्यांचे
जखमी कसा ग सांगू आनंद वाटलेला |४|
रस्ते अनेक दिसती ओसाड चालता मी
वाटयास मात्र माझ्या गर्दी झपाटलेला |५|
💬 प्रतिसाद
(2)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 06/23/2011 - 07:41
नवीन
आवडली!!
- Log in or register to post comments
ध
धन्या
गुरुवार, 06/23/2011 - 16:30
नवीन
लिहित रहा...
- Log in or register to post comments