पाककृती

पालक बेसन पोळा (धिरडं)

Primary tabs

साहित्य : १ जुडी पालक (थोडे पाणी घालुन वाफवुन पेस्ट करुन घ्या) गरजेपुरते बेसन १ चिरलेला कांदा थोडी चिरलेली कोथिंबिर २-३ चिरलेल्या मिरच्या हिंग हळ्द मिठ थोडा गोडा किंवा गरम मसाला (ऑप्शनल) तेल Image removed. पाककृती : वरील साहित्यातील तेल सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्या. चांगले ढवळा. Image removed. आता तव्यावर थोडे तेल पसरवुन ह्याचे पोळे, धिरडे काय म्हणाल ते तुमच्या आवडीच्या साईझ मध्ये टाका. एकदम पण मोठा नको नाहीतर उलटताना त्रास होईल. Image removed. गॅस मिडीयम ठेवा ४-५ मिनीटांनी उलथा. थोडेसे तेल परत सोडा (जर तव्याला असेल तर नाही टाकलेत तरी चालेल)परत ५-६ मिनीटे ठेउन दाबुन शिजला आहे का ते पहा. जर दाबल्यावर त्यातुन ओला रस येत असेल तर गॅस मंद करुन थोडावेळ दोन्ही बाजुने शिजु द्या. आहे की नाही एकदम सोप्पी रेसिपी. आता हा पोळा नुसता खा नाहीतर जेवणावर साईड डिश म्हणुन वापरा. Image removed. अधिक टिपा : पौष्टीकतेसाठी तसेच लहान मुले पालकची भाजी नुसती खात नाहीत म्हणून पालक टाकला आहे. ह्या अजुन किसलेला गाजर, बिट, कोबी तसेच आवडीच्या भाज्याही टाकु शकतो.
मिसळपाव

Finally, मला खाता येण्याजोगा पदार्थ टाकलास :-)

रेवती

पाकृ छान आहे बदल म्हणून!
आजच मी तांदूळ पिठी आणि बेसन मिश्र पिठांची धिरडी केली होती.
त्यात कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, हळद, मिरची घातली होती.

जागु

मिसळपाव नाही नाही मासे नाही संपले. पण व्हेजींसाठी पण काहीतरी हवे ना म्हणून हे.

विशाखा, चित्रा, रवती, शिल्पा,सागर, सानिका धन्यवाद.

आत्मशून्य

आता हा पोळा नुसता खा नाहीतर जेवणावर साईड डिश म्हणुन वापरा.

साइड डीश ? सकाळ दूपार संध्याकाळ अख्खा दीवस जाइल यावर :)

प्राजु

मी पालक चिरून २ मिनिटे मायक्रोवेव करते म्हणजे तो थोडासा मऊ होतो. मग पेस्ट न करताच बेसन आणि तांदुळाच्या पीठाच्या मिश्रणात घालते.
आता असेही करून बघेन.
मस्त पाकृ.