कलादालन

गो-ग्रिन नर्सरी-युसुफ मेहेर अली सेंटर

Primary tabs

गो ग्रिन नर्सरी ही युसुफ मेहेरअली सेंटरचीच शाखा आहे. तिथे गेल्यावर विविध झाडे दिसतात अगदी परीचयाची व अपरीचितही. भरपुर झाडे होती आणि माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे जेवढे शक्य होतील तितके फोटो घेतले. पत्ता युसुफ मेहेर अली सेंटर - गो-ग्रिन नर्सरी तारा, कर्नाळा ग्रामपंचायत मुंबई-गोवा मार्ग पनवेल. १) नर्सरीचे गेट Image removed. २) नर्सरीच्या गेट च्या बाहेरील सुशोभित केलेली जागा. Image removed. ३) बोगनवेली Image removed. ४) खडकांनी सुशोभित केलेले डबके Image removed. ५) सदाफुली Image removed. ६) बोन्साय चिंच Image removed. ७) रानजाई Image removed. ८) जास्वंद Image removed. ९) इनडोअर प्लांट्स Image removed. १०) Image removed. ११) Image removed. १२) Image removed. १३) Image removed. १४) Image removed. १५) बहरलेली मधुमालती Image removed. १६) बटरफ्लाय आकारात झाडांची रचना Image removed. १७) रुद्राक्षाचे झाड Image removed. १८) रुद्राक्षाचे झाड Image removed. १९) अननस Image removed. २०) कॅकटस Image removed. काही औषधी वनस्पती २१) Image removed. २२) Image removed. २३) सागरगोटा Image removed. २४) वावडींग Image removed. २५) लघुसर्पगंध Image removed. २६) गुळवेल Image removed. २७) शेंदरी Image removed. २८) कर्दळ Image removed. २९) कर्दळ Image removed. ३०) लाल चाफा Image removed. ३१) वाळा Image removed. ३२) खैर Image removed. ३३) Image removed. ३४) घाणेरी Image removed. ३५) अबोली Image removed.
अनामिक

व्वा, छाण आहे नर्सरी!
काय छान फोटू आहेत. काही (औषधी) वनस्पतींची फक्तं नावेच माहीत होती, तुमच्यामुळे बघायलाही मिळाली. रुद्रा़क्षाचं झाडही पहिल्यांदाच पाहतोय.

अगदी साठवण्यासारखा धागा आहे.

ते ३३ नंबर काय आहे नेमकं?

आणि खैर म्हणजेच लाजाळूचं झाड आहे का?

सन्दीप

अरे वा आतिशय सुन्दर फोटो आणी छान वनस्पती ची माहीती.

मृत्युन्जय

सुंदर सफर. धन्यवाद. एकदा गेलेच पाहिजे या नर्सरीत आता.

अजया

मी नेहेमी तिथुनच झाड घेते. तुमचे फोटो खूपच छान!

जबर्‍याच !

तो मधुमालतीचा फटु झकासच. पण ते ३३ नं. वाले काय आहे ? कोणी जाणकार उजेड पाडेल काय ?

काही झाडांचा पसारा बघुन डाण्रावांच्या डोक्यावरच्या केसांची आठवण झाली.

इरसाल

ती जावित्रि आहे.जायफळाचे फूल.

वाहीदा

पावसाळा आला अन जागूचा धागा पण आला
जागु ,
झाड-फनुस, गुल - गुलशन-गुलफाम का काफी शौक दिखता है तुम्हें !

सगळी झाडे आवडली पण मला ते बोन्साय चिंचेचे झाड नाही आवडले.
मला ते .एखाद्या पक्षाचे पंख कापावे तसे झाडाची मुळे कापून... आपल्या स्वार्थासाठी त्याची वाढ खुंटवून... स्वआनंदासाठी जवळ ठेवण्यासारखे बोन्साय वाढविण्याचे तत्व वाटते.

मधुमालती अन अबोली सर्वात छान !

प्रचेतस

जागुतै, सुरेख धागा काढला आहेस.
बर्‍याच वनस्पतींची माहिती झाली तुझ्यामुळे.

इरसाल

कोकणातले दिवस आठवले.
रुद्राक्ष कच्चे असताना मिठाच्या पाण्यात उकळून छान लागतात.

सुनील

गो-ग्रीन नर्सरीतील अनेक झाडे आणि युसुफ मेहेरअली सेंटरमधील अनेक वस्तू (साबण, मध, खादीच्या वस्तू इ.) वरचेवर विकत घेत असतो.

जागु

अनामिक मी काल पण गेले होते त्या नर्सरीत काल विचारल मी त्याच नाव पण तिथल्या कामगाराला माहीत नव्हत. आणि दुसर कुणाला विचारायला मला वेळ कमी होता.

संदिप, मृत्युंजय, अजया, राजकुमार, वल्ली

इरसाल नाही जायफळाच झाड खुप मोठ असत. आणि तो वृक्ष अगदी कुंडीत लावलेला होता.

हो वहीदा मला झाडांचा खुप शौक आहे.

सुनिल पुढचे धागे युसुफ मेहेरअली सेंटरचे टाकते.

इरसाल मी पहीलांदाच पाहील ते रुद्राक्षाच झाड.

स्मिता.

जागुताई, सगळे फोटो क्लास आहेत. बघूनच मन प्रसन्न झालं :)

अशी बहरलेली मधुमालतीची वेल खूप दिवसांनी पाहिली, एकदम मस्त! अननसाचं झाड(?) पहिल्यांदा पाहिलं, ते कसं असेल याची खूप उत्सुकता होती.

मधुमालती खत्तरनाक आहे ... होस्टेलमधेच एक झाड आहे, पडल्यापडल्या त्या फुलांच गंध आला की बिशाद मी पुढची (निदान) दहा मिनीटं गादीवरून उठायची!

RUPALI POYEKAR

तुमच्या या छंदाला सलाम, माझी आईपण तुमच्यासारखीच होती.

मदनबाण

ओ य जागु ताय वाळा असा दिसतो ते आज पहिल्यांदा पाहिले,खैर पटकन मला लाजाळुचे झाड वाटले.