Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अन... हात तुझा हातात.

झ — झंम्प्या, Mon, 06/27/2011 - 15:16
उधाणलेला समुद्र, बेफान लाटा, गार वारा, अन... अन... हात तुझा हातात. पौर्णिमेची रात्र, खिडकीखाली नक्षत्रांचा सडा पायी घेऊन उभा पारिजात, मंत्रमुग्ध सुगंध, अन... अन... हात तुझा हातात. पावसाची रिपरिप, अंगावर कोसळणाऱ्या सरी अथांग भिजलेलो मी, अन... अन... हात तुझा हातात थकलेला जीव, खोलीभर अंधार. एकटेपणाची बोचरी जाणीव, अन... अन... हात तुझा हातात घाबरलेलो मी, बिथर्लेलो मी, कुशीत डोकं ठेऊन रडणारा मी, अन... अन... हात तुझा हातात बागेत खेळणारी आपली छकुली, दुडक्या चालीने दवडणारी ती, कौतुकाने पाहणारा मी, अन... अन... हात तुझा हातात निवांत संध्याकाळ, मावळतीचा दिनकर, गोंगाट सुद्धा वाटावा श्वासोश्वास, अन... अन... हात तुझा हातात संपलेला प्रवास, थकलेली गात्र, अशक्त शरीर, मिटणारे डोळे, अन... अन... हात तुझा हातात

प्रतिक्रिया द्या
2350 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 06/27/2011 - 19:10 नवीन
आवडला.... प्रवास... हात हातात घेऊन केलेला!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 06/27/2011 - 19:42 नवीन
कविता अप्रतिम ... मनापासुन आवडली फक्त थकलेला जीव, खोलीभर अंधार. एकटेपणाची बोचरी जाणीव, अन... अन... हात तुझा हातात हे कळाले नाहि
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Tue, 06/28/2011 - 05:44 नवीन
आयुष्यात कधीकधी गर्दीतसुद्धा एकटेपणाची जाणीव एक जाणीव होते. त्या वेळी एक बकालपणा समोर उभा ठाकतो, माहित असत कि हे क्षणिक आहे. आणि हि वेळ लवकर सरून जाईन, पण त्या क्षणी, तुम्हाला जी एकटेपणाची जाणीव होते, ती जाणीव मला व्यक्त करायची होती, अशा वेळी तुमच्या हळव्या मनाला कोणाच्या तरी आधाराची गरज भासते..... "आपल्या" व्यक्तीकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
प
परिकथेतील राजकुमार Tue, 06/28/2011 - 08:43 नवीन
आयुष्यात कधीकधी गर्दीतसुद्धा एकटेपणाची जाणीव एक जाणीव होते. त्या वेळी एक बकालपणा समोर उभा ठाकतो, माहित असत कि हे क्षणिक आहे.
तुम्हाला भकासपणा म्हणायचे आहे का? गर्दीत सुद्धा एकटेपणा आणि बकालपणा फक्त 'सुलभ' मध्येच जाणवतो सहसा. बुधवारची रात्र, मिपावरती अवांतराचा सडा डूख धरुन उभा मिपाद्वेष्ट, ग्लेनफिडिचचा सुगंध, अन... अन... किबोर्ड तुझ्या हातात. हे कसे वाटते ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झंम्प्या
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/28/2011 - 07:59 नवीन
एकदम मस्त...ह्रुदयस्पर्शी...खुप छान... कविता वाचल्यावर,अगदी जवळचं माणुस भेटल्या सारखं वाटल बघा...असच लिहित रहा...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 06/28/2011 - 08:23 नवीन
वावा ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा