पाककृती

गाजराचा हलवा

Primary tabs

तुमच्या लक्षात आलंच असेल की हा केवळ 'गाजर हलवा' नाहीये तर रितसर गाजराचा हलवा आहे ;) लहानपणापासून मला गाजराचा हलवा फार आवडतो. आणि सध्या फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर व्हॅनिला आइसक्रिम मिळते, ते तर... अहाहा! अश्या या सदाबहार हलव्याची पाकृ मात्र एकदम सोप्पी आहे. साहित्य: मध्यम आकाराचे ६ गाजर १ टेस्पून साजूक तूप १ वाटी साखर १ वाटी दूध चिमूटभर वेलची पूड सजावटीसाठी सुक्यामेव्याचे तुकडे कृती: गाजर स्वच्छ धुवून कोरडे करून किसून घ्यावे. Image removed. कढई किंवा पसरट भांड्यात मंद आचेवर तूप गरम करावे. त्यात गाजराचा किस घालून मध्यम आचेवर शिजवावे. Image removed. गाजराचा जरा मऊ झाला की त्यात साखर घालून हलक्या हाताने मिक्स करावे. साखरेमुळे मिश्रणाला पाणी सुटते. त्यामुळे भांड्याला मिळणारी आच वाढवायला हरकत नाही. पण अधूनमधून हलवत राहून खालून जळणार नाही याची खबरदारी घ्यावी. Image removed. मिश्रण कोरडे व्हायला लागले की आच पुन्हा मंद करून दूध घालावे. बरेच लोक आवडीप्रमाणे खवा/कन्डेन्स्ड मिल्क सुद्धा घालतात. Image removed. हलवा आपल्याला हवा तसा ओलसर/कोरडा झाला की त्यात वेलची पूड मिक्स करून आचेवरून उतरवून घ्यावा. गरमागरम हलवा वाटीत काढून त्यावर सजावटीसाठी सुक्यामेव्याचे तुकडे पेरावे आणि....... पुढचे सांगायची गरज नाही :) Image removed.
चिरोटा

छान. एक चमचा तूप पुरते का ? बर्‍याच घरी पाहुण्यांना सर्व केला जातो तो हलवा विस्कळीत असतो. लग्नात/ हॉटेलांमध्ये देतात तो एकसंध वाटतो.

स्मिता.

चिरोटाराव, गाजराच्या हलव्यात साजूक तूप घालतात कारण सुरूवातीला आपण फक्त गाजराचा कीस शिजवतो तो गरम भाड्याला चिटकू नये आणि तूपाचा छान सुगंधा यावा. त्यामुळे १ मोठा चमचा (टेबल स्पून) तूप पुरेसे असते.

हॉटेलांत देतात तो हलवा एकसंध/ओलसर असतो खरा. तो कसा याची काही कल्पना नाही. बहुदा साखर घातल्यावर सुटणारे पाणी पूर्ण आटवत नसावेत.

स्मिता.

अरे वा!! काजू पेस्ट घालून गाजराचा हलवा... पण जरा जास्तच कॅलरीज नाही का रे होणार?

मी आपलं कॅलरीचा फक्त विचार करते आणि चांगलं लागलं की सगळं खाते ;)

यकु

व्वा!
पाकृ बुकमार्क्ड!

रेसिपी मस्त

सध्या फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर व्हॅनिला आइसक्रिम मिळते, ते तर... अहाहा!

असेच फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर गुलकंदआइसक्रिम पन मिळते, ते पन... अहाहा अहाहा!!!!

नगरीनिरंजन

खवा किंवा कन्डेन्स्ड मिल्क घातल्यास मस्त होतो असा स्वानुभव आहे.

स्मिता.

सनिकाताई, खवा घालून हलवा रीच तर होतोच पण त्याने लगेच पोट भरते आणि मनसोक्त खाता येत नाही ;)
माझी आई जर पाहुणे येणार असतील तरच खवा किंवा कन्डेस्ड मिल्क घालते, रिच वाटावा म्हणून :)

श्रावण मोडक

सनिकाताई, खवा घालून हलवा रीच तर होतोच पण त्याने लगेच पोट भरते आणि मनसोक्त खाता येत नाही Wink
माझी आई जर पाहुणे येणार असतील तरच खवा किंवा कन्डेस्ड मिल्क घालते, रिच वाटावा म्हणून Smile

;)
ह.घ्या.हे वे.सां.न ल.

स्मिता.

श्रामो, बरोब्बर पकडलत हं तुम्ही!! मनसोक्त हसले :)

स्पा

असा केशरी गजर हलवा???

मद्रासी गाजर वापरली आहेत वाटत

स्मिता.

मराठी लोकांना लहानपणापासून लाल गाजर बघायची सवय असल्याने आजकाल येणारे केशरी गाजर पहिल्यांदा बघून जरा वेगळे वाटते. पण आजकाल आपल्याकडेही केशरी गाजरे जास्त मिळायला लागली आहेत.

मी पॅरिसमधे असल्याने येथे मिळालीत ती गाजरे वापरलेली आहेत.

रेवती

मद्रासी गाजर वापरली आहेत वाटत

प्रांतवादाचं मूळ हे आहे!;)

स्मिता.

सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे आणि वाचकांचे आभार!

बर्‍याच प्रतिक्रियांमधून खवा घालण्याचा उल्लेख आला आहे. खवा घालून हलवा छानच लागतो. पण तो ऑप्शनल आहे. खवा/कन्डेन्स्ड मिल्क/मिल्क पावडर घालून हलव्याला आणखी रीच बनवता येते.

रेवती

जरा (म्हणजे बरीच) उशिराने प्रतिक्रिया देते आहे.
हलवा आवडला. फोटू छान आलाय.
तू आधीच आभार मानल्याने मी माझेच मानून घेते. काळजी नसावी.;)