Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी असा जुगारी...

ब — बन्या बापु, Sat, 07/02/2011 - 04:33
पुन्हा खेळलो मी डाव तो जुगारी, कसे आवरू मी या मना विकारी ? झगडा तो जीवनाचा संपेल ना कधीही, पंख शोधेल कोण, मारेल कोण भरारी ? आहेत सगळे माझे, परके कोणी ना इथे, वार का त्यांचे लागले जिव्हारी ? श्वास संपले आता, खेळही संपला आता, कसे नाकारू सत्य हे विखारी. फासे फेकलेले, दान ते त्याचे, कसे जिंकेल कोणी जो तो इथे भिकारी ? येईन फिरून मीही एकदा असा कि, डाव सोडून जाईल नियती ही बिचारी..

प्रतिक्रिया द्या
1756 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ग
गणेशा Tue, 07/05/2011 - 12:54 नवीन
अप्रतिम कविता .. मनापासुन आवडली
  • Log in or register to post comments
अ
अजातशत्रु Tue, 07/05/2011 - 14:53 नवीन
आहेत सगळे माझे, परके कोणी ना इथे, वार का त्यांचे लागले जिव्हारी ? श्वास संपले आता, खेळही संपला आता, कसे नाकारू सत्य हे विखारी. खासच ! . . . . . . . . डाव मांडला कुणी,कुणी पसरली इथे पथारी, दिसते माणूसकी कधी इथे? प्रत्येकजणच इथे माणूसकीचा शिकारी. ही अतिशयोक्ति असल्यास क्षमस्व
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा