पाककृती
राजस्थानी मिक्स दाल
Primary tabs
राजस्थानी मिक्स दाल
हि डाळ बनवायला अगदी सोप्पी अन टेस्टला एकदम झक्कास असते .
साहित्य : १ कप तुरीची डाळ ,१/ २ कप चना डाळ ,१/२ कप मुग डाळ (तुमच्या आवडीनुसार प्रमाण ठेवा )
२ बारीक चिरलेले कांदे ,२ बारीक चिरलेले टोमॅटो ,अमूल बटर ३चमचे (देसी घी पण चालेल),कढीपत्ता ,जीर -मोहरी ,हिंग ,१ तेजपत्ता ,एक दालचिनी तुकडा ,ठेचलेला लसून १ चमचा मिरची पावडर १ चमचा ,गरम मसाला १ चमचा ,धना पावडर १ चमचा , १/२ चमचा आमचूर पावडर (ऑप्शनल),मीठ ,चिरलेली कोथिंबीर
कृती : तुरीची डाळ आणि हरबर्याची डाळ १ तास आधी स्वछ धुवून पाण्यात भिजवून ठेवावी ,(मुगाची डाळ भिजवण्याची गरज नाही)
नंतर कुकर मध्ये ह्या तीनही डाळी घालून एक चमचा हळद आणि पाणी घालून शिजवून घ्याव्यात .
शिजवलेली डाळ छान फेटून घ्यावी
तडक्या साठी : एका पॅन मध्ये ३ चमचे बटर घाला .तेजपत्ता अन दालचिनी तुकडा घाला ,जीर- मोहरी ,कढीपत्ता अन हिंग घालून खमंग फोडणी द्या ,ठेचलेला लसून घाला. आता चिरलेला कांदा घालून परतून घ्या ,कांदा सोनेरी होऊ लागला कि टोमॅटो घाला , छान परतून झाल कि मिरची पावडर गरम मसाला ,धने पावडर आमचूर पावडर घालून घ्या ,परतल्याचा खमंग वास सुटू लागला कि फेटलेली डाळ घाला .चवीनुसार मीठ आणि हळद घाला
क्रीम अन कोथिंबीर ने सजवा हि डाळ जीरा राइस बरोबर एकदम मस्त लागते ,गरम गरम तुप लावलेल्या चपातिबरोबर तर विचारुच नका अप्रतिम !
:)
पाक्रु सहीच..
फोटो सुद्धा अगदी टेम्प्टिन्ग आहे....
धन्यु...
जाड गरम पोळ्या आणि अशी दाल !! :)
क्रिम ऐवजी फक्त लाल मिरचीचा तडका देउन करावी म्हणतो. :)
+ १ सहमत !
मला पण लाल मिरचीचा तडका देण्याचा मोह झालाच होता :)
असो.
आज करुनच बघते.. :)
व्वाह्!!!!!!!!काय रंग आलाय !मस्त वाटतेय पाकृ.,करुन बघेल.
छान... मला जमेल असं वाटतंय..
तेजपत्ता हे प्रकरण काय आहे?
मराठीत त्याला तमालपत्र म्हणतात. अख्ख्या गरम मसाल्यामध्ये मोठी मोठी सुकलेली पाने असतात ती.
धन्यवाद!
मस्तच दिसते आहे.
फक्त गणपा म्हणतो त्याप्रमाणे लाल मिर्च का तडका हवाच.. :) म्हणजे आणखी मस्त होईल.
स्वाती
हो, लाल मिरची आणि लसुण... खुप छान लागेल. :)
मस्त
भट्टी जमुन आलेली आहे !!
अवांतर : दाल बाटी मधे हीच दाल खातात का ??
माझ्या मते दाल बाटी मध्ये साधं, पातळ वरण असतं.
बाकी, राजस्थानी दाल मस्तच गं पियुशा! मलाही क्रिम पेक्षा लाल मिरचीचा तडका घातलेली आवडते.
पाकृ आवडली.
मस्त आहे..........
पाककृती आवडली.
-
गिळुषा.
छान मस्त झालीय दाळ, या आधी पहायची कशी राहुन गेली कळालंच नाही.