Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा...

व — विदेश, Tue, 07/05/2011 - 11:07
(चाल : गंगा जमुना डोळयात उभ्या का -) होंडा इंडिका थाटात उभ्या का जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा... |धृ | कडकडुनी तू मिठी मारता, डोळे माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे आठवले सारे सारे गहाण ते गाळे तुज कर्जाचे भय न संगती, जा |१| जा मुला जा.... श्रीमंत उभी सासरा नि सासू जोडी बघ धूड सासुचे हसले तोंड ती वेंगाडी पूस रे डोळे या सदऱ्याने - आवर ती जाडी रूप दर्पणी नसे देखणे, जा |२| जा मुला जा.... आय.टी.ची ती सून वाढत्या पगाराची जमले तिचे रे कैसे तुजवर लव्ह - लफडे हटू नकोस मागे मागे काम कितीही पडे नकोस विसरू धुणि-भांड्याला, जा |३| जा मुला जा....

प्रतिक्रिया द्या
1929 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
नाना बेरके Tue, 07/05/2011 - 11:28 नवीन
विडंबन आवडले. पण पी. सावळाराम ह्यांची आठवण ह्यानिमित्ताने झाली त्याचे जास्त विशेष. देव जरी मज कधी भेटला...., कल्पवृक्ष कन्येसाठी....., असावे घरटे आपुले छान...., जेथे सागरा धरणी मिळते.. अशांसारखी उत्तमोत्तम गाणी देणारा, कवितेतून जिव्हाळ्याची उत्कट भावनामूल्य जपणारा कवी म्हणून मला पी. सावळाराम फार आवडतात.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 07/05/2011 - 12:33 नवीन
मी चुकुन तिच्या ऐवजी त्याच्या वाचल. बाकी विडंबन झकास जमले आहे. मुळ गाणे अतिशय सुरेख आणि श्रवणिय आहे.
  • Log in or register to post comments
य
यकु Tue, 07/05/2011 - 12:52 नवीन
विडंबन मस्त!!!! "माहेरची साडी " गाणं पण फिट्ट बसतंय या चालीवर!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 07/05/2011 - 18:02 नवीन
झक्कास जमलय !!!
  • Log in or register to post comments
स
स्वप्ना_तुषार Sat, 07/09/2011 - 09:41 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा