Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नातीगोती

अ — अरुण मनोहर, Mon, 07/11/2011 - 04:43
नाती गोती मानवी संबंधांचे जाळे समजणे किती क्लिष्ट असते नाही! चहुकडे विणलेल्या संबधांच्या बरोबर मध्यभागी माणूस स्वत: मी-पण सुरक्षीत ठेवायला पहातो. ह्या ’मी’ भोवती अनेक वर्तुळे तो बनवतो. आई वडील, पत्नी, मुले ह्यांची वर्तुळे. इतर कुटुंबीय, नातेवाईक, शेजारपाजार, मोहल्ला, व्यापार-नोकरी निमित्य जोडलेले, समभाषिक, समविचारी...... हजारो वर्तुळांचे जाळे ह्या ’मी’ला घेरून टाकते. एका वर्तुळामधल्या स्पंदनांचा कधी दुसऱ्या वर्तुळांवर चांगला---वाईट परिणाम देखील होत असतो. मग त्यातून मोह, मत्सर, स्पर्धा अशा अनेक समस्या निर्माण होतात. आपल्या आपणच निर्माण केलेया ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आणि आतमधल्या ’मी’ला धक्का पोहचू नाही असे पहात ही नातीगोत्यांची जाळी सांभाळीत माणूस जगत असतो. मध्यभागी बिंदु, बिंदुलागी सिंधु सिंधु वादळीया भोवऱ्यांचा. भोवऱ्यांचे ठायी कितीक भोवरे भिजलेले एकऽऽदुजे रंगी. रंगल्या आपणापासूनिया रेषा रेषांनी वेढली बिंदी घट्ट. बिंदी पहिली ती, वर्तुळे घेरली त्याही पलीकडे अपार अनंत अनंत आतल्या वार्ता अंतर्मुखी बाहेरच्या जाणे अंतर्बाह्य तरीही आतले आणिक बाह्यही एक धागीया गुंफ़िले ह्रदयी होताची स्पंदने आंतलिया वेशी वेशीपलिकडे पोहचविती धागे, धागे जे बहिऱ्या प्रेमाचे आंधळे सुजती गा नाती, कंपाचा ठणका ठणका जे ग्रासी, विणलेली नाती नाती कुढताती होउनिया मुक मुक पडे लुळे जाळे बलवान फ़ुका सांडलेला निरर्थ पसारा

प्रतिक्रिया द्या
2492 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 07/11/2011 - 08:22 नवीन
क्या बात!! काय सुंदर रचना आहे. अरुणजी, तुम्हाला __/\__
ठणका जे ग्रासी, विणलेली नाती नाती कुढताती होउनिया मुक मुक पडे लुळे जाळे बलवान फ़ुका सांडलेला निरर्थ पसारा
व्वाह!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 07/11/2011 - 08:23 नवीन
प्र. का. टा. आ.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 07/12/2011 - 12:56 नवीन
कविता संदरच..
रंगल्या आपणापासूनिया रेषा रेषांनी वेढली बिंदी घट्ट. बिंदी पहिली ती, वर्तुळे घेरली त्याही पलीकडे अपार अनंत
अप्रतिम कडवे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा