भंगलेल्या मनाचा अभंग ३
कसे त्यागू देवा
"मी" पण माझे
वाटे जरी ओझे
टाकवेना
आत्म अभिमान
आणि स्वाभिमान
सांगेल का कोण
भेदाभेद
एकतत्त्वनाम
झाले बदनाम
धर्माधर्म स्तोम
भोवताली
"मी" पणाचा शोध
घेतो आहे "मी"च
आता बाबा तूच
धाव देवा
राहिले रे आता
कितीसे रे दिन
चरणी मी लीन
दीनानाथा
प्रार्थणारा मीच
ऐकणारा मीच
जन्मोन्मी हाच
नाच देवा
एकतत्त्व नाम
धरितो मी दृढ
बालक सुदृढ
अहंकारी
💬 प्रतिसाद
(2)
आ
आंसमा शख्स
Tue, 07/12/2011 - 00:55
नवीन
चांगले काव्य
एकतत्त्व नाम
धरितो मी दृढ
बालक सुदृढ
अहंकारी हे आवडले.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 07/12/2011 - 16:30
नवीन
सुंदर अभंग
मनापासुन आवडला.
जास्त आवडला
अवांतर : तरीही दूसर्या ओळीतील ६ ऐवजी ५ च अक्षरे आली आहेत. तेथे काही योग्य बदल ?
- Log in or register to post comments