Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणाला कुणाचे कशाला हवे

ध — धनंजय, Tue, 07/12/2011 - 04:26
कुणाला कुणाचे कशाला हवे
- - -
जळाला तळ्याचे कशाला हवे मनाला जनाचे कशाला हवे
.
कुठे काय झाले कधी अन् कसे कुणाला कुणाचे कशाला हवे
.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे
.
प्रिया बांध रे बंध नाजूकसे परी त्यात काचे कशाला हवे
.
मला दाखवी रूप माझे खरे हसे आरशाचे कशाला हवे
.
धन्या फायद्याचे पहा नीटसे लळे चाकराचे कशाला हवे
- - -

प्रतिक्रिया द्या
4019 वाचन

💬 प्रतिसाद (22)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/12/2011 - 05:01 नवीन
तिसरं कडवं (का शेर?) इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटलं. धन्या हा श्लेष आवडला. कविताही आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अलख निरंजन Tue, 07/12/2011 - 16:18 नवीन
धन्या हा श्लेष आवडला.
धन्या?? काय वय ह्या धन्याचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋ
ऋषिकेश Tue, 07/12/2011 - 05:24 नवीन
उ त्त म!!!!!!! रचना फारच आवडली! तिसरा आणि शेवट्चे दोन शेर अधिक आवडले. १. मनाला जनाचे कशाला हवे की जनाला मनाचे? यातून काय सुचवायचे आहे? की फक्त अनुप्रास साधला आहे? २. रचनेला गझल असे का वर्गीकृत केलेले नाही?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/12/2011 - 06:06 नवीन
सुरेख गजल! धन्याशेठ, फारच छान! -रंगा
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 07/12/2011 - 06:43 नवीन
चांगली रचना, आवडली. पुन्हा-पुन्हा वाचावीशी. अवांतर: फुलटॉस आहे. तरीही रंगाशेठ फक्त 'सुरेख गझल'वर थांबले हे पाहून ड्वाले पाणावले... ;)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 07/12/2011 - 06:44 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/12/2011 - 10:48 नवीन
उत्तम अप्रतिम
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 07/12/2011 - 11:03 नवीन
गझल आवडली.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे रडे काळजाचे कशाला हवे . चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे
हे विशेष आवडले.
मला दाखवी रूप माझे खरे हसे आरशाचे कशाला हवे
हा शेर - दिसावे मला रूप माझे खरे हसू आरशाचे कशाला हवे? असाही वाचला. 'धन्या'चा श्लेष थोडा घुसवल्यासारखा वाटला.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 07/13/2011 - 07:18 नवीन
'धन्याचा श्लेष' याविषयी सहमत. सुचवणीही आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
प
पल्लवी Tue, 07/12/2011 - 12:19 नवीन
प्रत्येक शेर स्वतंत्र आणि सुंदर.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 07/12/2011 - 12:43 नवीन
कविता, गझल वैग्रे प्रकार कळत नाहीत, पण हे जे काय आहे ते एकदम आवडले.
चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे
हे जबर्‍याच.
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 07/12/2011 - 14:31 नवीन
काव्य आवडले .
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 07/12/2011 - 14:39 नवीन
दिल बहलाने के लिये खयाल अच्छा है| रचना आवडली. :)
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/12/2011 - 15:47 नवीन
कविता स्फुराया कशाला हवे जनाला छळाया कशाला हवे कुठे काय झाले कधी अन् कसे कुणाला कुणाचे कळाया हवे डुआयड्यांमध्येही मुखवटे बरे आयपी कळायला कशाला हवे जाउ द्या पुरे :-) नक्की काय म्हणायचे कळले नाही बहुदा गझल /सात लघुकविता आहेत बाकी आ.क.फा.का.क.ना. हे. मा.आ.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 07/12/2011 - 16:18 नवीन
जगात कशाने कशाला काय फरक पडतो? विशेषतः जग काय करतं त्याने मला काय फरक पडतो. असा काहीसा तिरकस प्रश्न विचारत सुरू होते. इथे कोण कोणाचा आहे? असा ऱ्हेटॉरिकल प्रश्न विचारते. मनुष्य हे बेट आहे असं सांगते. नंतरचे शेर यापासून थोडी फारकत घेतात, पण कशाला हवे चं सूत्र कायम राहातं. गजलेच्या गुच्छातली फुलं एकाच छटेतली आहेत हे पाहून बरं वाटलं.
  • Log in or register to post comments
अ
अलख निरंजन Tue, 07/12/2011 - 16:18 नवीन
.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 07/12/2011 - 16:35 नवीन
मला दाखवी रूप माझे खरे हसे आरशाचे कशाला हवे
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Tue, 07/12/2011 - 18:10 नवीन
आवडली कविता ..हल्ली मला असेच काहीसे वाटत असते :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/12/2011 - 19:04 नवीन
प्रत्येक दोन ओळीत स्वतंत्र कथानक आहे. सुंदर.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/13/2011 - 05:14 नवीन
मला दाखवी रूप माझे खरे हसे आरशाचे कशाला हवे सुंदर... :)
  • Log in or register to post comments
स
सोनल कर्णिक वायकुळ Wed, 07/13/2011 - 06:52 नवीन
कविता आवडली. दुखवट्यामध्येही मुखवटे बरे रडे काळजाचे कशाला हवे . चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे.... हे सुन्दर. पण आशय मिश्र वाटला. काही कडवी उपहासिक आणि प्रहार करणारी पण काहि फक्त यमक जुळवणारी वाटली.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/13/2011 - 07:00 नवीन
छान कविता धनंजयसर. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा