धग
माझ्या भावनांची धग;
मी जाणीवपूर्वक कमी करतो आहे;..
जेणेकरून त्यांची झळ;
तुला कधीच अस्वस्थ करणार नाही.........
.......... मी जळालो तरी तुला कळणार नाही.....
मला माहित आहे,.......
दिवस ढळणार नाही, रात्र मावळणार नाही.........
स्वप्नपंखात वाढणारं वारूळही; कधी कोसळणार नाही.........
.........पण
आभाळ फाटलं तरीही,
आता ते गळणार नाही.........
उन्हासोबत सावली; तसा वार्याबरोबर गंध येणार.....
गाढ साखरझोपेतदेखिल; चाहूल तुझी देणार..............
सुखात तुझ्या;
माझा मी;
अंग मोडून पडणार..
चुकून आलंच वादळ-.....
माझ्या अंगावरती घेणार.......
घाबरू नकोस,.........
............चूक-भूल; देणे-घेणे; डोळे मिटूनच होणार......
सावरीचं कुंपण;....
फक्त आधाराला असणार...............
...........................अज्ञात
💬 प्रतिसाद
(1)
प
प्राजु
गुरुवार, 07/14/2011 - 01:52
नवीन
वाह!
- Log in or register to post comments