Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विडंबनकाव्यमाला-भाग-२

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 07/13/2011 - 06:18
मुळ काव्य- ''मी माझा''-कवी-चंद्रशेखर गोखले...............................................विडंबन-''मग तू कुणाचा?''-सूर्यकांत खोकले माझ्या हसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या शिवण्यावर जाऊ नका माझ्या रुसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या उसवण्यावर जाऊ नका जरी तुमच्यात बसलो तरी...........................................मी दुकानात असलो तरी(सुद्धा?) माझ्या असण्यावर जाऊ नका......................................मला 'टेलर' म्हणुन पाहू नका.... तक्रार ही नाही की.....................................................तक्रार ही नाही,की-तो चंद्र आत डोकावतो.....................................................चंदू आत डोकावतो पण त्याचं बघुन चोंबडा...........................................पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या प्राजक्तही सोकावतो...................................................शरदही सोकावतो एकदा आकाशाचा अंकुर..........................................एकदा शेजारचा चंदू माझ्या मनात रुजला.............................................आंम्हाला बघुन लाजला पण परिस्थितीच अशी...........................................पण परिस्थितीच 'अशी' की तो मनातच कुजला...........................................की तो तिथेच बुजला... एक अशी रात्र हवी........................................एक अशी विहीर हवी जीला पहाट जोडलेली नाही.....................................जिला रहाट जोडलेला नाही अशक्यातली गोष्ट आहे..................................तांब्यातली गोष्ट आहे ही पण मी आशा सोडलेली नाही...............................पण मी बादली सोडलेली नाही पहाटेला क्षितिजावर......................................कढईच्या क्षितिजावर चांदण्यांचा गाव.......................................वड्यांचा गाव आणी कुशीत येताना सुद्धा....................................आणी सुरीत येताना झोपत असल्याचा आव.................................चपापला पाव पराग दिवेकर...........

Book traversal links for विडंबनकाव्यमाला-भाग-२

  • ‹ विडंबन काव्यमाला-भाग-१ ''मी माझा''(मग तू कुणाचा?)
  • Up
  • विडंबनकाव्यमाला-भाग-३ ›

प्रतिक्रिया द्या
4861 वाचन

💬 प्रतिसाद (16)
क
कच्ची कैरी Wed, 07/13/2011 - 13:24 नवीन
>>माझ्या हसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या शिवण्यावर जाऊ नका माझ्या रुसण्यावर जाऊ नका.....................................>><<< माझ्या प्रतिसादावर जाउ नका ..कविता चांगली जमुन आलीये .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/13/2011 - 13:59 नवीन
नाही जात तुमच्या प्रती---सादा---वर....धन्यवाद
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 07/13/2011 - 15:02 नवीन
मस्त मजा आली वाचुन .. विडंबन तसा माझा नावडता काव्य प्रकार.. तरीही तुम्ही खुप मजा आणली आहे त्यामुळॅ छान वाटले
तक्रार ही नाही,की-तो चंदू आत डोकावतो पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या शरदही सोकावतो
मस्त एकदम .. मुळ काव्यातील खालील ओळी लाजवाब
पहाटेला क्षितिजावर चांदण्यांचा गाव आणी कुशीत येताना सुद्धा झोपत असल्याचा आव
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 07/13/2011 - 15:22 नवीन
कढईच्या क्षितिजावर वड्यांचा गाव आणी सुरीत येताना चपापला पाव
वा वा ,, बहोत खूब, एकदम डोळ्यासमोर चित्र उभे केलेत.....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/13/2011 - 16:37 नवीन
ह्हा ह्हा हा....हे विडंबन 'झालं' तेंव्हा आमच्या नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळच्या अण्णा कडचा वडापाव नुकताच पोटात समाधिस्त झालावता....त्यामुळे ''पोटी होतं(च),ते ओठी आलं'' असं खय्रा अर्थानी झालं असावं...प्रतिसादाबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
स
स्वानन्द Wed, 07/13/2011 - 18:34 नवीन
क्रमांक दोन आणि तीन च्या विडंबोळ्या आवडल्या. चौथी अज्जिबात झेपली नाही. :-|
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/13/2011 - 21:28 नवीन
नवा शब्द---विडंबोळ्या---वाहव्वा लई झ्याक ...अता ह्यो कुटतरी नक्की वापरु...ह्ही ह्ही ह्ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
प
प्रचेतस Fri, 05/05/2017 - 06:04 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 05/05/2017 - 11:12 नवीन
तक्रार ही नाही,की-तो चंदू आत डोकावतो पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या शरदही सोकावतो
एकदा शेजारचा चंदू आंम्हाला बघुन लाजला पण परिस्थितीच 'अशी' की तो तिथेच बुजला..
चंदूने असं काय दाखवलं की शरद सोकावला आणि असं काय झालं की ताबडतोब दुसर्‍या कडव्यात चंदू 'बुजला'?? अवघड!! =)) =))
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/06/2017 - 05:50 नवीन
ख रा ब........फुटलो बे...!!! =)) शरदाचं "चांदणं" दाखवलं असावं चंदुने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Sat, 05/06/2017 - 20:32 नवीन
बुव्या बुव्या जिल्बीकार हाती कळ(फलक) प्रतिभा अपार तांब्या ठेवला दारापाशी नि:शब्द जाहलो बुव्यापाशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 05/07/2017 - 05:12 नवीन
हाती का पोटी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पद्मावति Fri, 05/05/2017 - 17:36 नवीन
कढईच्या क्षितिजावर वड्यांचा गाव आणी सुरीत येताना चपापला पाव
=))
  • Log in or register to post comments
इ
इना Fri, 05/05/2017 - 20:11 नवीन
घ्या गुर्जी, वाईट किडे सुरू झाले ना डोक्यात हा धागा वाचून =)) घट्ट लावून घेतलेलं दार बाहेर "ओक्यूपाईड"च तोरण अहो, हे कसलं बिना गाण्याचं कार्य उरकण्याचं धोरण?
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 05/05/2017 - 20:16 नवीन
=)) कहर!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/06/2017 - 05:48 नवीन
का हो हे चंदु आणि मेंगळ्या शरद कोण? =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा