पाककृती

झटपट काजु-खोबर्‍याचे लाडू

Primary tabs

साहित्यः अडीच वाट्या डेसीकेटेड कोकोनट (सुक्या खोबर्‍याचा कीस) पाऊण वाटी कडेंन्सड मिल्क एक वाटी काजुपूड दीड चमचा साजुक तुप ३-४ चमचे पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, कडेंन्सड मिल्क असुनही थोडी पिठीसाखर घालावी लागते कारण सुक्या खोबर्‍यामुळे गोडवा कमी होतो). १ छोटा चमचा वेलचीपुड Image removed. पाकृ: तुपात डेसीकेटेड कोकोनट खमंग, चांगला परतून घेणे. Image removed. दुसर्‍या बाऊलमधे कडेंन्सड मिल्क, काजुपुड, पिठीसाखर व वेलचीपुड घालून, मिक्स करणे. (गुठळ्या होऊ न देणे) Image removed. आता त्यात जितके मावेल तितके परतलेले डेसीकेटेड कोकोनट घालणे. Image removed. तयार मिश्रणाचे लाडू वळ्वणे व थोड्या डेसीकेटेड कोकोनटमध्ये घोळवणे. लाडू खाण्यास तयार आहे. Image removed.
Mrunalini

मस्त आहे गं.... चव एकदम मस्त असेल... करुन बघितले पाहिजे. :)

५० फक्त

मेलो, खपलो, तुमचं करणं आणि तुमची भांडी आणि फोटो जाम भारी आहे.

एक शंका, - तो प्लॅस्टिकचा चमचा जळत नाही का हो खोबरं भाजताना. ?

कच्ची कैरी

हं यम्मी दिसताहेत लाडु ,तस लाडु माझा वीक पॉईंट आहे ,म्हणुन येऊ द्या अजुन .

स्पा

अहाहा..एकदम यम्मी ....
सजावट जाम आवडली
फोटो अतिशय सुंदर

मदनबाण

लाडू आणि तेही "काजु" युक्त !!! :) सह्हीच... :)

त्रिवेणी

वर आणतेय हि रेसिपी.दिवाळीला करेन. या वर्षी चकल्यांचा पहिला परयोग यशस्वी झाला.आता मोहिम लाडू.