Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्थलांतर

अ — अरुण मनोहर, Sun, 07/17/2011 - 06:34
काळा, शिशु होतो तेव्हा खादाड मी राऊ होतो उनाड मी काऊ होतो बडबडी मी चिऊ होतो स्वच्छंदी मी पक्षी होतो काळा, युवक होतो तेव्हा सशा सारखा मी देखणा होतो हरणासारखा मी चपळ होतो चित्यासारखा मी आक्रमक होतो उमदा मी प्राणी होतो काळा, प्रौढ होतो तेव्हा राबणारी मी मुंगी होतो साठवणारी मधमाशी होतो जाळी विणणारा कोळी होतो कष्टकरी मी कीटक होतो काळा, तुझ्यामुळे मी वृद्ध झालो शिशू-युवक-प्रौढ.... स्थलांतरे कर-करून मी विद्ध झालो इतरांसाठी जगून मी बद्ध झालो पक्षी, प्राणी, किटक पुन्हा बनू दे आता फ़क्त माझ्यासाठी जगू दे पक्षाचे मला पंख दे शरीराची नसेल, तरी मनाची भरारी दे प्राण्याची मला आक्रमकता दे अनुभवाच्या बलाची जाणीव राहू दे कीटकाची चिकाटी दे बांधलेली जाळी आणि वारुळे काळा, तुझ्या स्थलांतरांनी मोडली तरी पुन्हा रचण्याची उम्मीद दे -- यशवंत काकड ह्यांच्या एका रचनेवरून स्फुरलेली कविता

प्रतिक्रिया द्या
1256 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ब
बहुगुणी Mon, 07/18/2011 - 14:32 नवीन
आवडली! (यशवंत काकडांच्या मूळ लेखनाचा दुवा उपलब्ध असेल तर तोही द्या, वाचायला आवडेल. धन्यवाद!)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 07/18/2011 - 15:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा