Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पिंकी, परी आणि मोर -

व — विदेश, Sun, 07/17/2011 - 06:57
परीने विचारले, पिंकीच्या कानात - ' यायचं का तुला आंब्याच्या वनात ? मोराचा पिसारा छान पहायला मोरासंगे खूप खूप नाचायला ! ' पिंकी परीसंगे गेली पटकन मोर तो समोर आला झटकन - मोराने पिसारा फुलवला छान पिंकीने हलवली खुषीत मान ! मोर कित्ती नाचला आनंदाने पिंकीने मोठ्ठ्याने म्हटले गाणे - पिसाऱ्यात बघून एकेक रंग पिंकी झाली होती भलतीच दंग ! जां तां ना हि पा नि पि आठवले रंग सारे डोळ्यांत साठवले - जांभळा तांबडा.. पिंकी म्हणू लागे कौतुकाने परी तिच्याकडे बघे ! " झोपेत किती बघा बडबडते - दिवसाही नको तिथं धडपडते ! " - आई पुटपुटे जाता पिंकीपाशी ओढते चादर तिची खस्सदिशी ! मोराचा पिसारा गेला कुणीकडे ? परी होती इथे - गेली कुणीकडे ! कुठली परी आणि कुठला मोर - डोळे चोळता दिसे आई समोर !

प्रतिक्रिया द्या
1723 वाचन

💬 प्रतिसाद (3)
P
PRASHANT M TAWDE Mon, 07/18/2011 - 09:09 नवीन
बलगीत सुन्दर आणी कल्पना सुन्दर आहे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 07/18/2011 - 13:34 नवीन
बालगीत छान जमले आहे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/20/2011 - 13:38 नवीन
मस्त आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा