कलादालन

माझी नवीन चित्रे

Primary tabs

माझी काही नवीन चित्रे: ही चित्रे माझ्या अनेक वर्षांच्या चित्रकलेतील खटाटोपींतून हळूहळू विकसित होत गेलेल्या स्वतःच्या शैलीतील आहेत. चित्र सुरु करताना ते कसे होणार आहे, म्हणजे बरे वाईट असे नव्हे, तर या चित्रात मी काय काय आणि कसे चित्रित करणार आहे, याची काहीही पूर्व कल्पना मला नसते. एक एक चित्र अनेक दिवस चालत रहाते... सुरुवतीला काही अनिश्चित असे रंग-आकार कॅनव्हास वर पसरवून ठेवतो, त्यातूनच कल्पनेला चालना मिळत जाऊन चित्र आकार घेत जाते. असे असले, तरी माझ्या अनेक चित्रात प्राचीन जागा, मंदिरे, राजवाडे, वडाच्या पारंब्या, मातीची घरे, ढग वगैरे असते... याचे कारण मी अनेक वर्षे अतिशय आवडीने अश्या अनेक जागांवर जाऊन, तिथे बसून चित्रे काढत आलो आहे... हल्लीची चित्रे मात्र अमूक अश्या विशिष्ट जागांची नसून माझ्या अनुभवातून आकार घेत जाणारी काल्पनिक चित्रे आहेत आणखी चित्रे खालील दुव्यावर बघता येतीलः http://www.flickr.com/photos/sharad_sovani/ Image removed.
पाषाणभेद

चित्रगुप्तांना चित्र गुप्तरितीने सादर करण्याची सवय दिसते आहे असे वाटते. मागल्या चित्राच्या धाग्यातही असेच झाले होते.

चित्रात बारकावे फारच छान चित्रीत केले आहेत. शैलीही छान आहे. मुर्त आहे.

धमाल मुलगा

झकास चित्रं काढता की द्येवा...
लोकांच्या पाप-पुण्याच्या डेबिट क्रेडिट वेंट्र्या मारता मारता एव्हढा वेळ मिळतो तरी कुठून म्हणतो मी. ;)

मृत्युन्जय

सुंदर चित्रे आहेत. सालं आम्हाल हे असलं कधी जमलं नाही आणि जमायचं बी नाही.

पिंगू

हेहेहे चित्रकलेत नेहमीच दांड्या उडायच्या. पण इथे तर चित्रकारिता धो धो बरसते आहे. लगे रहो चित्रगुप्तजी..

- (अडाणी चित्रकार) पिंगू

गणेशा

अतिशय छान चित्र..
विषेश करुन दूसर्या चित्रातील गर्द रंग खुपच छान वाटत आहे..

आणि पहिल्या चित्रातील गणपती, बुरुजाशेजारी चालणारा एक परिवार हे चित्रकाराच्या मनाचे वेगळेच तरंग दाखवत आहेत.

बहुगुणी

दोन्ही चित्रे आवडली.

दक्षिण-पूर्व इटली मधल्या मटेरा या भागातील पुरातन घरांची आठवण झाली, राहवत नाही म्हणून इथे त्या स्थळाची चित्रे टाकतो आहे:

Nile

असेच एक जॉर्डनचे.

स्मिता.

दोन्ही चित्रे छानच!
दुसरे जास्त आवडले. शांत रंग जास्त असल्याने डोळ्यांनाही एकप्रकारची शांतता मिळते.

यकु

खूप आवड्ली दोन्ही चित्रे!
:)

सहज

तुम्ही काढलेल्या दोन्ही चित्रांबद्दल कृपया अजुन माहीती द्यावी.

मदनबाण

पहिल्या चित्रातला गणपती बाप्पा लय आवडला... :)

(कला प्रेमी)

राघव

खूप आवडले. पण चित्राच्या पार्श्वभूमीबद्दल थोडे लिहाल का?
आम्हा सर्वांना मूळ संदर्भ नीट समजून घेण्यासाठी सोपे पडेल अन् चित्र बघतांनाचा आनंदही द्विगुणीत होईल. :)

राघव

चित्रगुप्त

चित्रांबद्दल थोडेसे लिहिले आहे, आणखी पुढे कधीतरी...

सहज

चित्रे छान आहेत. आता तुम्ही मोठे कलाकार आहात तर आम्ही काय बोलायचे.

माध्यम, रंग, एक चित्र पूर्ण व्हायला किती वेळ लागतो. चित्राचे विषय कसे निवडता इ वाचायला आवडेल.

आत्मशून्य

सुरुवतीला काही अनिश्चित असे रंग-आकार कॅनव्हास वर पसरवून ठेवतो, त्यातूनच कल्पनेला चालना मिळत जाऊन चित्र आकार घेत जाते.

खरोखर छान. स्वप्न सत्यामधे उतरवणे फार कमी लोकांना साधते. चित्र पाहताना त्यामधे खरोखर हरवल्यासारखे वाटते