कलादालन

एक अद्भुतरम्य जागा

Primary tabs

पॅरिसच्या गजबटापासून दूर, अतिशय शांत, निर्मनुष्य आणि अद्भुतरम्य जागा म्हणजे Parc de Saint Cloud. सुमारे ११३६ एकर जागेत पसरलेल्या या उद्यानात हजारो मोठमोठी झाडे, हिरवळी, गच्च झाडीने झाकलेल्या पायवाटा, टेकड्या, पुतळे, कारंजी वगैरे आहेत. सतराव्या शतकातील या जागेचे एक चित्र: Image removed. या चित्रात डावीकडे दिसणार्‍या भव्य प्रासादात सोळाव्या शतकापासून राजघराण्यातील लोकांचे वास्तव्य असायचे, मात्र १८७० सालच्या युद्धात हा प्रासाद आग लागून नष्ट झाला. १८७१ सालची भग्न प्रासादाची दृश्ये: Image removed. Image removed. येथील कॅस्केड चे १८४५ मधील एक चित्र: Image removed. एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे.... या प्रासाबद्दल दुवा: http://chateausaintcloud.wifeo.com/les-ruines.php

मस्त.. वाट पाहत आहे..
:) तिथे मूड बनला / वेळ असला / सामुग्री असली तर चित्रेही काढणार का? :)

किसन शिंदे

सतराव्या शतकातले त्या जागेचे चित्र सुंदर आहे.

फोटोंची वाट पाहतोय. :)

गणपा

सुरेख.

एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे....

वाट पहातो आहे.

स्वानन्द

मस्तच!!

असेच आपल्या शनिवारवाड्याचे मुळचे चित्र कुठे पहायला मिळेल का?

स्वानन्द

सह्हीच!! खाली चित्रगुप्त यांनी म्हटल्याप्रमाणे तो आगीत जळालेला सात मजली वाडा पूर्ण दिसेल असे चित्र पहायला मिळाले तर सोन्याहून पिवळं!!

पाषाणभेद

हं छान छायाचित्र आहे, फक्त तो पागोटे घातलेला मुलगा पर आहे की धमु आहे ते समजत नाही. जाणकारांनी खुलासा करावा.

सोत्रि

हा धमुचा मागच्या जन्मीचा बाल्पणाचा फोटो असावा असा इतीहासकारांचा दावा आहे. संशोधन चालू आहे, ते पुर्ण झाल्यावर 'शनिवार बुद्रुक टाइम्स' मधे बातमी झळकवण्याची सोय केली आहे. तरीही रोज न चुकता 'शनिवार बुद्रुक टाइम्स' वाचण्याचे करावे. (विकत घेउन, मोफत वाचनालयात हा ठेवला जात नाही)

- (इतीहास संशोधक) सोकाजी

चित्रगुप्त

शनिवारवाड्याचे आणखी फोटो, खास करून विहंगम दॄष्य उपलब्ध आहे का कुठे? कोटाच्या आतील सातमजली वाडा होता, त्याचे?

चित्रगुप्त

तसे चांगले आहे, पण आधुनिक, काल्पनिक आणि बटबटीत...
टोपीकरांनी नाही एखादे त्याकाळी चित्र काढुन ठेवलेले? खरेतर हे काम पेशव्यांनीच करायला हवे होते...