Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दोन कविता

अ — अरूण म्हात्रे, Mon, 07/25/2011 - 17:20
मज ठाऊक नव्हते दार कोणते तुझ्या घराचे उन्हे वेचण्यासाठी.... मी खूप श्रमाने दिवस फोडूनी असाच येतो लटकत भटकत उन्ह होउनी तुझ्या घराच्या काठी...... ________________________________ तू पहिल्यांदा भेटलीस ते दिवसच पावसाळी की स्वतःबरोबर आकाश रितं करणारा हा पाऊस सोबत घेऊन यायची तुझी जुनी सवय ! काहीच आठवत नाही--- ----इतकंच लख्ख जाणवतं की कुठूनतरी वीज कोसळली नि पागोळ्यांबरोबर खेळण्याचं माझं वय जळून गेलं ...... (या माझ्या दोन कविता आधी इतरत्र प्रसिध्द झाल्या आहेत. माझे मित्र रामदास यांनी पदार्पणासाठी काही लिहा अशी सूचना केली तेव्हा ज्या कविता त्या क्षणी आठवल्या त्या लिहून दिल्या .)

प्रतिक्रिया द्या
1598 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
श्रावण मोडक Mon, 07/25/2011 - 17:29 नवीन
स्वागत! या दोन कविता मानाव्यात का? कवीनं रचना दोन वेगवेगळ्या वेळेस केल्या, दोन वेगळ्या मनस्थितीत केल्या, दोन वेगळ्या अनुभवांसंदर्भात केल्या... ठीकच. तसं अस्तित्व रचनांचं असू शकतंच. तरीही त्यात सांगड आहे असं का वाटतंय?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 07/25/2011 - 18:00 नवीन
अतिशय सुंदर कविता.. खुप खुप मनापासुन आवडल्या. पुन्हा पुन्हा वाचल्या कविता. साध्या शब्दात ही खुप उच्च भाव सांगुन जाणारे शब्द. पहिली कविता विषेश आवडली... उन्ह वेचण्यासाठी येणारी आवडती मुलगी, दिवस फोडुन येणारे उन (सूर्यकिरण) ह्या कल्पना नविन अआणि तितक्याच लोभस. असेच लिहित रहा.. वाचत आहे. आणि हा, दमदार पदार्पण ..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 07/25/2011 - 19:49 नवीन
मस्त!! दुसरी खूपच आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/26/2011 - 06:03 नवीन
कसं शांत वाटलं...कविता वाचुन,अप्रतिम रचना...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा