प्लम केक- प्रकार २
Primary tabs
आमच्या त्सेंटा आजीची खासियत म्हणजे हा प्लम केक-

साहित्य-
१. बेस करिता:
१०० ग्राम बटर, १०० ग्राम साखर, २०० ग्राम मैदा, १ अंडे, १ च. चमचा बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ,
२ चमचे रम/कोनिऍक किवा १ चमचा वॅनिला अर्क
२.सरफेस करिता:
५०० ग्राम प्लम्स, ७५ ग्राम बदाम तुकडे, ३ च. चमचे साखर, १ च.चमचा दालचिनी पावडर
३. टॉपिंगकरिता:
१०० ग्राम मैदा, ६० ग्राम बटर, ६० ग्राम साखर, १ चमचा दालचिनी पावडर, १ चिमूट मीठ
कृती-
बेससाठीचे सर्व साहित्य एकत्र करणे व चांगले मळणे, हा गोळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ३० ते ४० मिनिटे ठेवणे.
टिन्ड प्लम असतील तर चाळणीवर घालून पाक निथळू देणे. जर फ्रेश प्लम्स असतील तर बिया काढून टाकणे.
प्लममध्ये बदाम तुकडे,दालचिनी पूड आणि साखर मिसळणे.
फ्रेश प्लम्स असतील तर ३ ते ४ चमचे साखर जास्त घालणे.
टॉपिंगसाठीचे सर्व साहित्य एकत्र करणे व मळून गोळा तयार करणे.
केकमोल्डला बटर लावून घेणे.
बेससाठीचा गोळा फ्रिजमधून बाहेर काढणे व केक मोल्डवर पसरणे, फक्त मोल्डच्या तळाशी न पसरता कडांपर्यंत वर नेणे.
आता मोल्डच्या आत मैद्याच्या मिश्रणाचा एक मोल्ड तयार होईल.
यावर प्लमचे मिश्रण पसरणे.
टॉपिंगसाठीच्या गोळ्याचे लहान गोळे, गुठळ्या करुन (streusel) त्या प्लम्सच्या मिश्रणावर पसरुन सर्व मिश्रण झाकून टाकणे.
प्रिहिटेड अवन मध्ये ५० ते ५५ मिनिटे १८० अंश से वर बेक करणे.

नेहमीप्रमाणेच झ का स !
मस्त ग केकतै.
अवांतर :- केकतैची पाकृ असल्याने 'हे कुठे मिळेल, ते कुठे मिळेल' असले प्रश्न टाळण्यात आलेले आहेत.
टोंडाला पाणी सुटले. :)
ह्म्म एकदा पत्रिका दाखवूनच घ्यावी म्हणतो की योग कधी आहे हे कळेल.
व्वा ! :)
मस्त!!!
आहाहा..... :)
मस्तच :)
फोटू पाहून निशब्द झाले.
मी लगेच निघतिये.....केक तयार ठेव.;)
:)
केक छान दिसतो आहे.
मस्त पाकृ. इथल्या एका कॉफी-शॉपमध्ये streusel कॉफी केक हादडल्यानंतर हे प्रकरण काय आहे, त्याबद्दल कुतूहल होतं; त्याचं आज शंकानिरसन झालं.
.
आता स्वातीतैने सुद्धा एक पुस्तक प्रसिद्ध करावे 'केकावली!' :)
-चटुरंग
खुद के साथ बातां - रंगा, ह्या वेळी केक हादडताना केसुंचा फटू कसा काय नाय आला?
भापो..प्रत्यक्ष त्सेंटा आजीच्या हातचा हा केक खाण्यास मिळाला असताना फोटो वगैरे सारख्या शुल्लक गोष्टीत वेळ वाया घालवण्यात आलेला नाही...
(व्यग्र)केशवसुमार
बाकी स्वातीताई केकॄ एक लंबर!! अस दर वेळेला वेगळे सांगायची गरज ???
(स्वातीताईच्या केकॄचा अधिकृत टेस्टर)केशवसुमार
आता वाटतं एक तर अंडी खायला सुरुवात केली पाहिजे नाहीतर जर्मनीत नोकरी शोधायला सुरुवात केली पाहिजे.
- (विचारमग्न) पिंगू
हॅप्पी बड्डे टू मी.
चला केक खायला चला सगळे आता.
झक्कास !!!!!
तोंडाला पाण्याचा पूर आलाय आवर घालण्यासाठी केकच लागेल ;)
स्वाती, या केकच्या प्रकाराला आमच्याकडे Waehe म्हणतात ग! प्लमकेक वेगळा असतो असा माझा अनुभव आहे. पण रेसिपी उत्तम आहे, करुन पाहीन. सध्या बाजारात प्रून्स व प्लम्सचा बहार आहेच.....
ललिताताई,प्लम केकच्या खूप रेशिप्या आहेत ना, हा Pflaumenkuchen mit Streuseln ह्या नावाने जर्मनीत ओळखला (आणि चापला जातो)
Waehe- Schweizer Obstkuchen असे गुगलल्यावर समजले. रेसिपीमध्ये थोडाथोडा फरक आहे..
स्वाती
स्वातीताई, हा केक बराचसा पायसारखा आहे नं!!! पाकृ छानच आहे , नक्की बनवून बघेन.
दिपाली