Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हातामधी घे तू जरा

प — पाषाणभेद, Fri, 07/29/2011 - 16:55
हातामधी घे तू जरा
हातामधी घे तू जरा गरमागरम तेल खालून वरून अंगाला माझ्या चोळ ||धृ|| कामाला मी निघतो डबा घेवून सकाळी तवाच सुरू होते ग माझी पहीली पाळी उभं राहून लेथमशीन मी चालवतो हातोड्यानं लोखंडावर दणके मी देतो कष्टाचं काम आहे हे सारं; नाही काही खायची भेळ ||१|| दुसर्‍या पाळीनं ग माझी लयी व्हती दैना उन्हातान्हाचा दिस हा जाता जाईना कामगाराचं जीनं हाय लयी बेकार राब राब राबवूनी घेई सुपरवायझर त्याच्यासंग चाले आमचा उंदरामांजराचा खेळ ||२|| तिसरी पाळी तर लयीच महाग आसती मी तिकडे कामात अन तू झोपून र्‍हाती तळमळ तळमळ करी नुसता जीव हा माझा रात्रपाळी विचका करी माझ्या झोपेचा अंग दाबाया तू जरासाक काढ आता वेळ ||३|| सगळे म्हणती जय जवान जय किसान कोणी लावती त्याला शेपूट जय विज्ञान कामगारांकडे पहायला सवड आहे कुणाला विश्वनिर्माता मोताद झाला भाकरीला आपलेच आपण निस्तरावे आपले प्रश्न महागायीच्या दिवसांत साधावा हातातोंडाचा मेळ ||४|| - कामगार पाषाणभेद (दगडफोड्या) २९/०७/२०११

प्रतिक्रिया द्या
1360 वाचन

💬 प्रतिसाद (2)
अ
अन्या दातार Fri, 07/29/2011 - 17:28 नवीन
कामगारांच्या जीवनाचे यथार्थ वर्णन! लगे रहो पाभे __/\__
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/29/2011 - 21:07 नवीन
परिणाम कारक वर्णन केलय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा