Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयुष्य कडेवर घेतो

ग — गंगाधर मुटे, Fri, 07/29/2011 - 18:14
आयुष्य कडेवर घेतो झुंजूमुंजू पहाटेला, आभा चढे आभाळाला काळोखाच्या भेगातुनी, सूर्य डोकावतो गारठल्या पंखामधी, आशा जागवतो सुन्यासुन्या शिवाराला, निजलेल्या आवाजाला चेव येण्याला कोंबडा, दारी बांग देतो सुस्तावल्या आळसाला दूर पांगवतो अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो अभयता पेरताना, रुजलेली फुलताना फळलेली पाहताना, जेव्हा आनंदतो तेव्हा मीच आयुष्याला, कडेवरी घेतो                                       गंगाधर मुटे --------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
1339 वाचन

💬 प्रतिसाद (5)
श
शुचि Fri, 07/29/2011 - 18:34 नवीन
सुंदर!!!
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 07/30/2011 - 13:36 नवीन
कविता छान आहे. सकाळचं वर्णन मस्त!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 07/30/2011 - 18:21 नवीन
खूप सुंदर!! मस्तच!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Mon, 08/01/2011 - 00:51 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/01/2011 - 05:45 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा