Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

प — पाषाणभेद, Sun, 07/31/2011 - 08:14
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
अरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली निट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ|| सकाळीच उठले मी अजाणतेपणी काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी पोट नाही भरले जरी न्याहरी केली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१|| पंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी भरलेलं ताट आले समोर दुपारी किती खावे किती नको झाले त्यावेळी कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२|| कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला संध्यासमय जवळ हा आला पाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०७/२०११

प्रतिक्रिया द्या
1308 वाचन

💬 प्रतिसाद (3)
इ
इंटरनेटस्नेही Mon, 08/01/2011 - 00:48 नवीन
चांगली कविता, कीप ईत अप, पाभे!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/01/2011 - 05:50 नवीन
लगे रहो दफोराव... :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 08/02/2011 - 16:52 नवीन
कविता छान नेहमीप्रमाणे.. अवांतर : ते आपल्या लोकनाट्याचे पुढचे भाग कवा येणार आहेत ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा