Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ड्रीमकॅचर

च — चित्रा, Wed, 08/03/2011 - 05:40
काळपट ओट्यावरून पाण्याचा हात फिरवून झाल्यानंतर रात्रीच्या अंधारात तिने पाहिले खिडकीबाहेर ते स्वप्न खुणावत अजून उभेच होते - ** पलंगावर टाकून आपले श्रांत क्लांत अंग भिंतींवरून सरकणार्‍या गाड्यांच्या सोबतीने झोपण्याआधी तिच्या लक्षात आले स्वप्न आत येऊ पाहत होते लगबगीने ** उठून तिने स्वप्नांची काढली गाळणी ठेवणीतली लटकावून दिली बेडरूममधील खिडकीवर. कुशीवर मग वळून तिला झोप कधी लागली कळलेच नाही.

प्रतिक्रिया द्या
4484 वाचन

💬 प्रतिसाद (31)
स
सहज Wed, 08/03/2011 - 05:52 नवीन
स्वप्नात अडकताना (काही स्वप्न पूरी करता करता) झोप (मनस्वास्थ) खराब होते आणी शांत झोप हवी असेल तर काही स्वप्नांना आवर घालावा लागतो. अशी काहीशी संमीश्र भावना वाटली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/07/2011 - 09:22 नवीन
स्वप्नात अडकताना (काही स्वप्न पूरी करता करता) झोप (मनस्वास्थ) खराब होते आणी शांत झोप हवी असेल तर काही स्वप्नांना आवर घालावा लागतो. अशी काहीशी संमीश्र भावना वाटली. असेच बोल्तो. बाकी, स्वप्नांना गाळणीची कल्पना लैच भारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/03/2011 - 07:37 नवीन
छान छान...
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 08/03/2011 - 07:44 नवीन
कविता आवडली. फक्त, गाळणी ठेवणीतली नसून रोजच वापरली जाणारी असेल असे वाटले.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 08/03/2011 - 08:14 नवीन
छान कल्पना अन् छान व्यक्तता!! स्वप्नांची गाळणी ही कल्पनाच खूप सुंदर आहे! राघव
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 08/03/2011 - 09:51 नवीन
क्या बात है! कल्पना एकुणात आवडली आणि पोचली
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 08/03/2011 - 09:53 नवीन
कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Wed, 08/03/2011 - 10:06 नवीन
कविता वाचुन नक्की काय वाट्लं सांगणं अवघड आहे. पण मनात लुकलुकलं काहीतरी. "माझ्याकडे बघ..माझ्याकडे बघ.." म्हणणार्‍या ईच्छा-आकांक्षांना थोपवुन ठेवणंच कधी कधी योग्य ठरतं, ह्या न त्या कारणांसाठी. कविता अप्रतिम झालिये !! खूप आवडली :) शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 08/03/2011 - 10:20 नवीन
सही काव्य आहे
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 08/03/2011 - 11:33 नवीन
स्टीफन किंगच्या ड्रीमकॅचर चित्रपट्/पूस्तकावर काही लीखाण केलय की काय म्हणून उत्सूकतेने धागा उगडला होता... पण कवीताही मस्तच आहे.
  • Log in or register to post comments
य
यकु Wed, 08/03/2011 - 12:37 नवीन
उत्स्फुर्त व सहज झालेली कविता आवडली.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Tue, 08/09/2011 - 10:08 नवीन
असेच बोल्तो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु
ग
गणपा Wed, 08/03/2011 - 12:55 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 08/03/2011 - 13:32 नवीन
स्वप्न ही कल्पना इथे अनेकांगांनी जातेय. रचनाही छान. तुम्ही हाही उपक्रम करता हे माहिती नव्हते.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 08/03/2011 - 15:06 नवीन
प्रतिसादांबद्दल आभारी आहे. @ सहज, @पल्लवी, प्रत्येकाला अर्थ (किंचित किंवा अगदी) वेगळा लागतो हे तर गृहित धरायला हवे. @ नगरीनिरंजन - खरे आहे. गाळणी ठेवणीतली असेल असे नाही. रोजच्याच वापरातली असू शकेल. ह्या ठिकाणी मी वेगळे शब्द योजले होते, ते एकेरी वाटल्याने बदलले. @श्रामो - धन्यवाद. मी हाही उपद्व्याप करते म्हणायचे असावे. @ राघव - गाळणीची कल्पना माझी नाही. ही कविता एका अमेरिकन इंडियन (नेटिव अमेरिकन) मिथकावरून सुचली. http://en.wikipedia.org/wiki/Dreamcatcher त्रासदायक स्वप्ने दूर ठेवण्यासाठी अशी गाळणी वापरण्याची जुनी रीत होती. ही स्वप्ने बहुदा गाळणीत अडकण्याइतकी लहान असावीत. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 08/03/2011 - 15:42 नवीन
हम्म... कविता आवडली. काय वाटले ते सांगू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 08/03/2011 - 17:43 नवीन
कविता छान.. स्वप्नांची गाळणी कल्पना आवडली. अवांतर : खुप दिवसानी येने केले ..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 08/03/2011 - 18:08 नवीन
मस्त! कल्पना छान आहे.. आवडली कविता.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 08/03/2011 - 18:36 नवीन
अशी स्वप्नं गाळणीतून पलीकडे आली की आणखी हवी हवीशी वाटत असतील!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 08/03/2011 - 18:47 नवीन
स्वप्नांची गाळणी हे स्वयंपाकघरातून आलेले कल्पनाचित्र आवडले. गाळणीत दु:स्वप्ने अडकावीत, आणि सुखस्वप्ने मात्र तिच्या साखरझोपेत झिरपावीत, अशी शुभेच्छा! Image removed. (चित्र : विकिपेडियावरून, मुक्त वापरास अनुमती)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 08/03/2011 - 19:53 नवीन
क्षणचित्रांची कविता आवडली.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/03/2011 - 20:21 नवीन
कविता आवडली. गाळणीचे नेटिव्ह अमेरिकन रूपकही चपखल, अवांतर - अगदी वेगळ्या अर्थाने गाळणीचं रुपक रोमन संस्कृतीत वापरलं जात असे. पहिल्या एलिझाबेथ राणीचं 'हाती गाळणी असे धरिली' पोझमधलं पोर्ट्रेट प्रसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 08/03/2011 - 21:27 नवीन
छान कविता आणि त्याबरोबर प्रतिसादांत आलेली इतर माहितीही छान.
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 08/04/2011 - 01:02 नवीन
सर्वांना धन्यवाद. नंदन यांच्या पोतडीतला खास प्रतिसाद नेहमीप्रमाणे वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/04/2011 - 06:02 नवीन
छान कविता... :) कुंभकर्णा सारखे ६ महिने जमणार नसेल, तरी ६ दिवस "गाढ" झोपायची लयं इच्छा हाय बघा ! ;) जाता जाता :--- झोप आणि "गाढ" झोप यात फार मोठा फरक आहे... २ तास जरी "गाढ" झोप मिळाली तरी त्या झोपेतुन उठल्यावर प्रचंड ताजेपणा जाणवतो... जरा विचार करुन पहा तर शेवटची "गाढ" झोप तुम्हाला कधी लागली होती ते ?
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 08/04/2011 - 12:26 नवीन
सुंदर कल्पना. गाळणीचे रूपक छानच. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे Sat, 08/06/2011 - 01:39 नवीन
एकदम नाविन्यपुर्ण आहे कविता. फ्रेश!!! प्रकाशित केल्याबद्द्ल खुप खुप आभार!!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/07/2011 - 16:22 नवीन
कविता म्हणून इतके दिवस हा धागा उघडला नव्हता. पण आज वाचला. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 08/09/2011 - 08:18 नवीन
मिपावर यावं आणि इतकं छानसं काही वाचून ताजंतवानं व्हावं! फार फार आवडली कविता. [आणि अर्थातच प्रतिसाद.]
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 08/09/2011 - 09:41 नवीन
सुन्दर कविता.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 08/10/2011 - 02:33 नवीन
कविता उशीराने वाचूनही कशी वाटली ते आवर्जून कळवणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा