Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<कायकू>

व — विजुभाऊ, Wed, 08/03/2011 - 10:32
आमची प्रेरणा ............. सांगायलाच पायजे का? शिग्रेटी फुंकशी पेग पटीयाला दुबार रीपीट... पहीली धारा वर्दळ सैरावैरा उत्साही बाटल्या चखणा हातात ग्लास रीकामा बाटली सैरावैरा पाऊल अडखळे आधार अनोळखी द्वारपालाचा बोलला पती बायको वोवाळी हैराण शेजारी ऐसेची हायकू मिपावरी लोक लिखतेच कायकू?

प्रतिक्रिया द्या
3636 वाचन

💬 प्रतिसाद (19)
ग
गणेशा Wed, 08/03/2011 - 10:42 नवीन
हायकु चे विडंबन जमलेले नाही मुळ विदेश यांच्या हायकु मध्ये ५-७-५ असा क्रम आहे. त्यात विडंबन करायचे म्हणजे कायम बाटली -नशा, सिगारेट अश्याच गोष्टी हव्या आहेत असे का वाटते येथे विडंबन करणार्या बर्याच मंडळींना तेच कळत नाहि. एकुन सपक झालेय लिखान
  • Log in or register to post comments
प
पंगा Wed, 08/03/2011 - 15:44 नवीन
हायकु चे विडंबन जमलेले नाही
सहमत.
मुळ विदेश यांच्या हायकु मध्ये ५-७-५ असा क्रम आहे.
सहमत/असहमत. "५-७-५ क्रम नाही, (म्हणून) हायकू नाही" याबद्दल सहमत. परंतु, "हे (म्हणजे हे विडंबन-किंवा-जे-काही-असेल-ते) हायकू आहे" असा दावा विजूभाऊंनी कोठे केल्याचे दिसले नाही, म्हणून असहमत.
त्यात विडंबन करायचे म्हणजे कायम बाटली -नशा, सिगारेट अश्याच गोष्टी हव्या आहेत असे का वाटते येथे विडंबन करणार्या बर्याच मंडळींना तेच कळत नाहि.
सहमत.
एकुन सपक झालेय लिखान
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
व
विजुभाऊ Wed, 08/03/2011 - 11:07 नवीन
हायकु चे विडंबन जमलेले नाही शक्य आहे. माझाही तसा दावा नाहिय्ये. मुळ विदेश यांच्या हायकु मध्ये ५-७-५ असा क्रम आहे. एखाद्या गोष्तीवरून काही लिहीले म्हणजे त्यात शब्द क्रम /अक्षर संख्या तश्शाच हव्यात असा आग्रह कशाला? त्यात विडंबन करायचे म्हणजे कायम बाटली -नशा, सिगारेट अश्याच गोष्टी हव्या आहेत असे का वाटते येथे विडंबन करणार्या बर्याच मंडळींना तेच कळत नाहि. ऑफिस, साहेब ,बायको , दारू या शिवाय विडंबन काव्य करून दाखवा.( चॅलेन्ज समजा हवे तर) दारु पिउन लटपटणारा माणूस हेच एक विडंबन असते. एकुन सपक झालेय लिखान स्पष्त मतप्रदर्शनाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 08/03/2011 - 11:45 नवीन
विजुभाऊ , स्पष्ट मताचा राग मानुन घेवु नये... राग असला तर माफी असावी. ------- प्रत्येक ओळीला रिप्लाय दिला नसता तर जास्त योग्य वाटले असते. असो , कुठलेही विडंबन हे मुळ काव्यासी सुसंगत हवे असे वाटते. (अगदी त्याची गेयता असेल तर तशीच गेयता विडंबनात ही यायला हवी असे वाटते.) जर तसे जमत नसेल तर स्वतंत्र काव्य काय वाईट आहे मग ? असो वाचक अनेक असतात, कदाचीत प्रत्येकाचे म्हणने वेगळे असते, माझे ही वेगळेच आहे मानावे. त्यामुळे जास्त मनावर न घेने. तुम्ही म्हणता तसे दारु, बाई, साहेब, ऑफिस विना विडंबन आहे माझ्याकडे, पण ते येथे देने मला योग्य वाटत नाही. स्वताची जाहिरात किंवा स्वताचेच खरे असे माझे म्हणणे नाही म्हणुन येथे ते देत नाही.. (चॅलेंज म्हंटला आहे म्हणुन व्यनी करतो, ते ही नको वाटते आहे पण करतो कारण उगाच दारु हा विषय घ्यायचा आणि सुमार विडंबन करायचे खरेच आवडत नाहि)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 08/03/2011 - 12:20 नवीन
विडंबन हा काव्य प्रकार मुळातच परोपजिवी आहे. एखाद्या खिल्ली उडवावी हा विडंबन काव्याचा उद्देश असतो. त्यातून उपहास या प्रकारचा विनोद निर्माण होतो. मूळ कविता चांगली असेल तर विडंबन देखील बरे होते. उदा : आम्ही कोण म्हणोनी काय पूसता..... ( गोविंदाग्रज( गडकरी) ..... केशवकुमार( अत्रे) ) साधारण कवितेचे विडंबन साधारणच होते
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/03/2011 - 14:30 नवीन
मस्त केलय विडंबन.वाचुन खदाखदा हस्लो...ह्हा ह्हा ह्हा ... :-):Smile: या निमित्तानी एक विनोदी हायकू अठवले... डावीकडे एक बाई उजवीकडे एक बाई मधे कुणीच नाही...ह्ही ह्ही ह्ही...:bigsmile:
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/03/2011 - 14:37 नवीन
डावीकडे एक बाई उजवीकडे एक बाई मधे कुणीच नाही...
वरच्या हायकू मधील पहिल्या दोन ओळीत बदल केल्यास संपूर्ण विनोदावरच पाणी फेरले जाईल हे नम्रपणे नमूद करु इच्छीतो. डावीकडे शबाना बाई उजवीकडे नंदीता बाई .......... हासा... हासा आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गणपा Wed, 08/03/2011 - 15:35 नवीन
तु तर एकदम 'आग'च लावलीस. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/03/2011 - 22:34 नवीन
ब्बाबो ब्बाबो...हसुन हसुन मरायची पाळी आली...ह्ही ह्ही ह्ही...:bigsmile: प...रा इज ओन ''फायर''... ;-) :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विजुभाऊ गुरुवार, 08/04/2011 - 12:38 नवीन
डावीकडे शबाना बाई उजवीकडे नंदीता बाई .......... हासा... हासा आता. प रा या ओळी अधीक व्यापक केल्या तर ? आता बघ ना डावीकडे ममताबाई उजवीकडे जयललीताबाई मधे भेटले बाजपेयी........... बघ ना तिनोळीला कसे वजन प्राप्त झाले. ;) अवांतरः या ओळी लिहीण्यात कोणत्याही राजकी पक्षाला कंट्रोल करणार्‍या संघटनेबद्दल कोणतीही छुपी कृती व्यक्त झालेली नाहिय्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/04/2011 - 12:49 नवीन
विजुभौ प्रबळ थत्तेचाचा बळकट संघ हलकट अवांतर धारा संपादक सैरावैरा द्वेष्टे उत्साही ! सदस्य देशात सदस्य परदेशात मिपा जात्यात .. डॉन्या तोर्‍यात धनाजीवाकडे जोषात हाल किबोर्डाचे ! सोत्री पेटले बिका हळवे नॉस्टेल्जिया जोरात ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/04/2011 - 12:56 नवीन
=)) =)) =)) पाणी पित होतो रे भाड्या....नरड्यात अडकलं पाणी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गणपा गुरुवार, 08/04/2011 - 15:43 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रभो गुरुवार, 08/04/2011 - 15:50 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
श
शुचि गुरुवार, 08/04/2011 - 19:28 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 08/04/2011 - 20:08 नवीन
*ड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विजुभाऊ गुरुवार, 08/04/2011 - 13:03 नवीन
नरड्यात अडकलं पाणी... बरे झाले कापी नव्हती ते.कळफलक वाचला..........
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/04/2011 - 13:13 नवीन
जाणारा जातो जिवानिशी, अन् टंकणारा म्हणतो..... असो. नशिबच आहे आमचं, त्याला कोण काय करणार? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विनायक प्रभू गुरुवार, 08/04/2011 - 13:21 नवीन
चान चान. अवांतरः झाली का नागपंचमी विजुभौ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा