कलादालन
दृष्टीभ्रम
Primary tabs
मीटिंग निमित्ताने एका हॉटेल मध्ये आलो आहे, मधे थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून मिपावर चक्कर टाकावी म्हणून लाऊंज मध्ये बसलो तर घडलेला किस्सा:
बर्याच खुर्च्या कलात्मक रीत्या मांडून ठेवलेल्या या लाऊंजमध्ये माझ्या खुर्चीखाली एक wavy पॅटर्नचा गालिचा होता.
तो गालिचा क्रॉस करून पलिकडे जाणार्या आईच्या मागे दुडुदुडू धावत आलेलं दोन-अडीच वर्षांचं बाळ. आई फरशीवरून गालिच्यावर, आणि मग गालिच्यावरून परत पलिकडच्या फरशीवर चालत निघाली. पण ते बाळ एकदम भेदरल्यासारखं गालिच्याच्या कडेला थांबलं, आणि त्याने आईला हाक मारून कडेवर घे म्हणून खुणावलं, आईला कारण काही कळलं की नाही माहित नाही, ती परतली आणि मुलाला कडेवर उचलून पुढे गेली; पण मला जाणवलं की त्या मुलाला काहीतरी वेगळं दिसलं गालिच्यावर, जे बसल्या जागेवरून मला (आणि कदाचित तिच्या उंचीवरून तिलाही) दिसलं नव्हतं. मी उठून ते बाळ जिथे थबकलं तिथे गेलो, आणि त्याच्या eye-level च्या उंचीवर वाकून पाहिलं.
No wonder, ते बाळ पुढे जायला घाबरलं ते. बघा तुम्हाला दिसतंय का.
मी माझ्या फोनचा कॅमेरा वापरून गालिच्याचे दोन फोटो काढले, माझ्या खुर्चीखाली दिसणारा गालिचा:
आणि त्या बाळाच्या डोक्याच्या उंचीवरून दिसणारा गालिचा:
(तुम्हाला 3-D effect इथे चित्रात दिसेल अशी आशा आहे.)
(अवांतरः On second thoughts, अडीच वर्षाचे असतांना आपल्याला इतकी स्वसंरक्षणाची जी अक्कल असते, ती आपण मोठं झाल्यावर कुठे पेंड खायला जाते?)
बाळाच्या उंचीवरून गालिचा लाटांसारखा दिसतो आहे.
घाबरगुंडी उडालेले बाळ डोळ्यासमोर आले.
छान निरिक्षण
बाळाच्या उंचीवरून गालिचा लाटांसारखा दिसतो आहे.
घाबरगुंडी उडालेले बाळ डोळ्यासमोर आले.
चित्रासारखेच म्हणते,
स्वाती
म्हणतो.
मस्तच!!
आता चांगली संधी आहे. हे तुम्ही त्या बाळाच्या आईला दाखवा व मग तुम्ही आणी त्या बाळानी दोघांनी हॉटेलवर खटला भरा की त्या गालीच्यामुळे तुम्हाला गरगरले, मानसीक त्रास झाला ;-)
लहान मुलाच्या नजरेनं पाहायचा प्रयत्न खूप आवडला.
नाईस थिंकिंग! आवडले.
मस्त ओ जबरा,
लहान असताना आपण प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा किंवा आपल्या मेंदुची पाटी कोरी ठेवुन पाह्तो, त्यामुळं त्याला प्रतिसाद म्हणुन येणा-या नैसर्गिक प्रतिक्रिया व्यक्त करतो त्यापैकिच एक स्वसंरक्षणाची, मोठं झाल्यावर मात्र प्रत्येक गोष्टीकडं पाहायचा दृष्टिकोन एक तर ठरलेला असतो किंवा ठरवुन दिला गेलेला असतो, त्याचा फरक पडतो.
>>>पंगा मोड<<< ल्ह्यायचं र्हायलं का हर्षदराव?
बाकी खरंच 'गुणी' हो आमचे बहुगुणी.
त्यात रंगछटा अन अधोरेखित केलेले शब्द नसतानाही तुम्हाला हा प्रश्न का पडावा हा प्रश्न मला पडलेला आहे......
- रंगेल भारदस्त
लय भारी. बाकी हॉटेल कंच म्हणायचं?
दृष्टीकोन आवडला. :)
राघव
त्या बाळासाठीची संवेदनशीलता खूप छान. तुम्हाला त्याच्या उंचीवरुन बघावंसं वाटलं यातच सगळं आलं.
...मार्जारहत्ये*साठी परंपरेने जबाबदार धरण्यात आलेला एक गुण.
* (स्वतःशीच खूणगाठ: काशीस्थित पंडितांना वर्दी दिली पाहिजे. द्रव्यप्राप्तीसाठी सुवर्णसंधी आहे.)
_/\_
_/\_
मस्त.
दोन लेव्हलवरील दृष्यात खूपच फरक दिसतो आहे.
नीट निरीक्षिल्यास खुर्चीखालील (प्रौढ चक्षुपातळीवरून पाहिलेल्या) गालिच्यातदेखील थोडाफार त्रिमितिसाक्षात्कार होतो.
अर्थात, त्रिमितिसाक्षात्काराच्या पातळीत खूपच फरक आहे, याबाबत सहमत.
'त्रिमितिसाक्षात्कार' म्हणजे नक्की काय? (Perception ला मराठीत 'साक्षात्कार' ही शब्दयोजना चपखल आहे का?-- हा जेन्युइन प्रश्न आहे).
'आभास' वापरलं तर चालेल का?
...वापरण्याचा प्रयत्न केला. ('इफेक्ट'करिता 'प्रभाव' या संदर्भात तितकासा बरोबर वाटला नाही.)
कदाचित नसेलही. (कदाचित 'इफेक्ट'करिताही नसू शकेल. खात्री नाही.) पण आयत्या वेळी जशी शब्दयोजना सुचली, तशी वापरली. योग्य असल्यास उत्तम, नसल्यास पुढील वेळेस बदलून घेऊच. (उचित पर्याय असल्यास जरूर सुचवावा.)
अर्धवट, आभास illusion साठी चपखल शब्दप्रयोग वाटतो. आणि सदर संदर्भात illusion अभिप्रेत असल्याने तसे म्हणणे रास्त होईल असे वाटते.
पंगा, मला वाटतं, हा effect नव्हता, तर आभास होता. आणि मी माझ्या प्रश्नानंतर लिहीलेले "हा जेन्युइन प्रश्न आहे' हे आपण वाचलेले दिसत नाही! खरोखरीच मलाही perception ला मराठी प्रतिशब्द सुचत नाही. कुणी सुचवेल काय? ('आकलन' कसा वाटतो?)
पर्सेप्शन- पर्सीव्ह- आकलन. जमतंय.
माझ्या डोळ्यासमोर बाळाच्या उंचीवर येउन गालिच्याचे निरीक्षण करणारे बहुगुणी आणि त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघणारे लाउंजमधले लोक आले :).
पण मला तुमची निरीक्षणशक्ती खुपच भावली. मुळात त्या बाळाने थांबुन कडेवर घ्यायला सांगितले तिथुन तुमच्या मनात असे काही निरीक्षण करण्याची इच्छा झाली हेच महत्वाचे.
अगदी असच म्हणतो. :)
अधोरेखिताबद्दल साशंक आहे.
हॅट्स ऑफ !
जबरी निरिक्षण आहे राव तुमचं..
- पिंगू
अव्वल.... जाम भारी.... विलक्षण....
एकदम छान किस्सा! तुमच्या निरीक्षण शक्तीला __/\__.
-(दृष्टिभ्रमिष्ट)रंगा
मृत्युंजय आणि गणपाशी सहमत.
मानले बुवा तुमच्या निरीक्षण शक्तीला.
आहातच तुम्ही बहुगुणी
डआकाटा
___/\___
लहानपणी असं घडू शकतं.
ते बाळ त्याची नाडी हातात धरूनच फिरत होतं, बहुगुणींनी ती वाचली नाही, चुकलंच त्यांचं.
मोठ्या मनाने बहुगुणींच्या चूकांकडे दूर्लक्ष कर.
बहुगुणी, कुठून लिहिलात हो लेख! :(
(लहानपणापासून भित्रा)रंगा
मी पीजे म्हणून टाकला होता..... एवडं गंभीर कशाला होताय ?