अंधार
स्वप्नांच्या सुंदर वाटेवर ,मी धडपडतो आहे,
समईची येते याद, अंधार वाढतो आहे.
मोत्यांना मानेवरच्या, शेवटी पाहिले होते,
शुभ्रधवल तो मोती, नयनात दाटतो आहे.
तुटलेल्या त्या नात्यांना मी किड लावली होती,
इतुकी की माझ्या मी, मनात सडतो आहे.
माहित नाही मजला गाडलो किती मी आहे
घावात क्षणाच्या येथे, मी अजुन सापडतो आहे.
💬 प्रतिसाद
(3)
न
निनाव
Sun, 08/07/2011 - 21:06
नवीन
छानच. पुलेशु.
- Log in or register to post comments
म
मर्द मराठा
Mon, 08/08/2011 - 18:58
नवीन
छान आहे... आर्तता काळजाला भिडतेय..
- Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे
गुरुवार, 08/11/2011 - 03:28
नवीन
निनाव आणि मराठा, खुप खुप आभार.
- Log in or register to post comments