Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तळतेस भजी तू जेव्हां -

व — विदेश, गुरुवार, 08/11/2011 - 15:09
(चाल: नसतेस घरी तू जेव्हां -) तळतेस भजी तू जेव्हां - जीव 'सुटका सुटका' म्हणतो.. मिरच्यांचे वरती तुकडे तोंडात घास का फिरतो ? बघ फेटून पीठ- कसाही का गोळा कच्चा जळतो ! ही जिव्हा रुचीहीन होते - अन् तोंड पोळता कण्हतो ! येताच कुणी दाराशी.. क्षणभरात सरती मागे खिडकीशी धुरकट वारा- तो वांधा करून जातो ! तव तेलीं विरघळणाऱ्या मज दिसती कायम गुठळ्या - त्रासाधिन खारट गोळे मी तसाच गुपचचुप खातो ! तू लांब सखे मज धाड नच सांगू ही भजी खाण्या - कढईचा जीव उगाच.. माझ्यासह कुरकुर करतो ! का अजून गॅसही मोठा ! ना तंत्रच जमले अजुनी ? भजी का तू तळतच पिडते - भजी खाऊन जीवच रडतो !!

प्रतिक्रिया द्या
3298 वाचन

💬 प्रतिसाद (17)
स
स्वैर परी गुरुवार, 08/11/2011 - 16:30 नवीन
विडंबन आवडलं! :)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 08/11/2011 - 17:06 नवीन
वेगळ्या, कुरकुरीत विषयावरचं विडंबन आवडलं. अजून येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 08/11/2011 - 20:21 नवीन
असेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
न
निवेदिता-ताई Sun, 08/14/2011 - 04:47 नवीन
असेच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/11/2011 - 21:10 नवीन
लई झ्याक जमली बगा भट्टी...पहीला घाना आवडला...फुडचा येउंद्या लवकर...जीभ पानी गाळाया लागली...ह्ही ह्ही ह्ही...:tongue:
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/11/2011 - 21:11 नवीन
लई झ्याक जमली बगा भट्टी...पहीला घाना आवडला...फुडचा येउंद्या लवकर...जीभ पानी गाळाया लागली...ह्ही ह्ही ह्ही...:tongue:
  • Log in or register to post comments
म
मस्तानी गुरुवार, 08/11/2011 - 23:12 नवीन
मस्तच !
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 08/12/2011 - 00:01 नवीन
जमलं, आणखी येऊ द्या!
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 08/12/2011 - 05:30 नवीन
सही विडंबन.. च्यायला सुरात आळवल्यावर बाकी लोक पाहायला लागले ना रे.. - पिंगू
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 08/12/2011 - 06:38 नवीन
अरेरे !! काय ही दारूण आवस्था ? म्हणजे तुमचं भज्यां साठी दाही दिशा .... असं असतं कि काय ? विडंबन चांगलं जमुन आलय ... अगदी सिंहगडावरच्या 'बाळू चा धाबा' मधे मिळणार्‍या खेकडा भज्यांसारखं .
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Fri, 08/12/2011 - 06:49 नवीन
जबरदस्त.. आवडेश !!
  • Log in or register to post comments
म
मनराव Fri, 08/12/2011 - 07:00 नवीन
भारी.......!!!!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Sun, 08/14/2011 - 10:47 नवीन
झक्कास जमले आहे विडंबन.
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 08/15/2011 - 06:59 नवीन
करपलेल्या "कार्बन" भज्यांवरचं विडंबन झ्याक जमलंय, राव... बाकी सध्या अगदी "भजाळलेलं" वातावरण आहे, नाही !? येवू द्यात आणखी...
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Tue, 08/16/2011 - 08:38 नवीन
क ड क खुसखुशीत
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 08/16/2011 - 09:10 नवीन
खुसखुशीत विडंबन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
च
चिर्कुट Tue, 08/16/2011 - 09:20 नवीन
झक्कासच आहे.. :-) अजून येऊद्या..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा