पाककृती

मासे ३०) शिंगाळ्याची अंडी

Primary tabs

साहित्यः शिंगाळ्यांची अंडी हिंग, हळद मसाला १ कांदा बारीक चिरुन मिठ कोकम्/टोमॅटो किंवा चिंच थोडासा गरम मसाला. थोडी चिरलेली कोथिंबिर तेल हा आहे शिंगाळ्याच्या अंड्यांचा घड Image removed. पाककृती : प्रथम शिंगाळ्याची अंडी घडातुन बाहेर काढुन सुट्टी करुन घ्यावीत व स्वच्छ धुवुन घ्यावीत. Image removed. जवळून मोतीच वाटतात ना ? Image removed. ही स्वच्छ धुतलेली अंडी एका भांड्यात पाणी ठेउन, हिंग, हळद मिठ घालुन शिजवावी. कडक झाली म्हणजे शिजली असे समजतात. ही अंडी अशिच उकडूनही खातात. लहान मुले ही अंडी अशिच उकडून खातात असे कोळीण सांगत होती. आत पुर्ण कडक पिठुळ चविच मांस असत. ही नुसती खाउन मजा नाही आली म्हणुन मग मी त्याला कांद्यावर परतली. तेलावर कांदा परतवुन त्यात हिंग, हळद मसाला घातला मग त्यात टोमॅटो किंवा काहीतरी थोडे आंबट घालुन अंडी टाकली. वरुन गरम मसाला, मिठ, कोथिंबिर टाकुन एक वाफ आणुन थोड परतुन गॅस बंद केला. झाली मसालेदार अंडी तय्यार. Image removed. अधिक टिपा: शिंगाळा ह्या माश्याच्या पोटात ही अंडी सापडतात. अंड्यावरुनच हा मासा मोठा असतो हे समजत. त्या माशाचेही कालवण करतात तो मिळाल्यावर देते रेसिपी. ह्या अंड्यांची भजी पण करतात. ही अंडी डाररेक्ट तव्यावर टाकु नयेत तळण्यासाठी नाहीतर टणाटण उडतात घरामध्ये व सगळीकडे पसरतात. माझ्या सासर्‍यांनी माझ्या लग्नाच्या आधी हा प्रयोग केला होता आणि अंडी घरभर पसरली होती असे सगळे सांगतात. प्रात्यक्षिक पाहायला मी नव्हते. त्यानंतर परत घरात ही अंडी आणली नव्हती.
पिंगू

आजपर्यंत कधी पाहिली नव्हती..

- पिंगू

पंगा

शिंगाळी म्हणजे नेमका कोणता मासा? (इंग्रजी नाव काय?)

(तत्सम दिसणारा काहीतरी प्रकार सुशी-स्वरूपात खाल्लेला आहे. अर्थात कच्चा, आणि बिगर-तेल-तिखटमीठ-मसाला. देशी-मसाला-आवृत्तीबद्दल अर्थातच काहीही कल्पना नाही.)

पंगा

आभारी आहे.

शुचि

कॉड्लिव्हर ऑईलच्या सोनेरी गोळ्यांसारखी वाटताहेत अंडी.

धनंजय

"शॅड" नावाच्या माशाच्या अंड्यांचा घड यू. एस.च्या पूर्व किनार्‍यावर वसंत ऋतूत मिळतो. त्यामुळे कदाचित हा प्रयोग करायला वर्षभर वाट बघावी लागणार :-(

नाहीतर शिंगाळ्याचीच (कॅटफिश) अंडी शोधायला पाहिजे.

साल्मन माशाची अंडी देखील हॉटेलात खाल्लेली आहेत. ("सुशी"मध्ये)

(अंडी फार वेळ शिजवली तर अतिशय कडक होतात, ते टाळावे, असे ऐकले आहे.)

सुनील

(अंडी फार वेळ शिजवली तर अतिशय कडक होतात, ते टाळावे, असे ऐकले आहे.)
हे कोंबडीच्या अंड्याबाबत खरे आहे, तेव्हा अन्य अंड्याबाबतदेखिल असू शकेल.

सुनील

वेगळीच पा़कृ कधी खाल्ली नव्हती!

सहज

जागूतै तुमच्या गावात जागा/ फ्लॅट आहे का? घेईन म्हणतो.

पालेभाज्या व जलचर यांची रेलचेल आहे!!

गवि

गाबोळी म्हणजे हीच का? नुकताच विजयदुर्गावर गळाला लागलेला शिंगटा बघितला होता.. शिंगाडा म्हणजे शिंगटाच असावा.

हीच गाबोळी असेल तर ती फार आवडली नव्हती. शिवाय एवढे सगळे पुढे मोठे मासे झाले असते ते तळून खाता आले असते हा विचारही अंडी बघून येतो.. ़:) ही ही..

जाई.

जागुतै ती अंडी खरोखरच मोत्यासारखी दिसतात.
सुरेख
पाककृती आवडली

जागु

गगनविहारी नाही ती गाबोळी नाही. अंडीच आहेत. गाबोळीची अंडी अगदी खसखशीच्या आकाराची असुन एका आवरणात बांधलेली असतात.

पैसा हो हे शिंगाळा मासे,

पिंगु, पंगा, शुची, धनंजय, धन्यवाद.

सुनिल हो खर आहे ते. कोंबडीच्या अंडीचे ऑम्लेट जरी जास्त वेळ शिजवले तरी ते चिवटसर लागते.

सहज शोधला तर मिळेल. पण भावाने उच्चांग गाठला आहे.

जाइ, राजकुमार धन्स.

गणपा

मोती? मला तर ती द्राक्षचं वाटली.
माश्याच्या गाबोळ्या, अंडी ही डेलीकसी आहेत. महाग पण असतात बर्‍यापैकी.
पदार्थ आवडला हे वेसांनल. :)

इरसाल

जागुताई च्या कोणत्याही पाकृ उचला जबरदस्तच.
कोणत्याही माश्यांची (मासे) अंडी म्हणजे जीव कि प्राण.
तळलेली अंडी नुसत्या भाताबरोबर खायला पण मजा येते.

शाहिर

जन्माला येइ पर्यन्त सुद्धा ह्या मांसा हारी लोकांनी वाट पाहिली नाही ..

हे सुन्दर जग बघण्या आधि त्या कोवळ्या पिल्लांना शिज्वुन भजुन खाल्लात :(

पंगा

आयुष्यास प्रारंभ कधी होतो, हा एक रोचक प्रश्न आहे.

(Roe vs. Wadeचा हा नवीन, आगळावेगळा आयाम म्हणता यावा का?)

जागु

शाहिर तुमच्या भावना समजु शकतात. पण जेंव्हा आपण मोड आलेले कडधान्य खातो तेही कोवळे जन्माला येणारे जीव असतात.