पाककृती

नारळीभात

Primary tabs

Image removed. साहित्यः २ वाटया बासमती तांदुळ स्वच्छ धुवून अर्धा तास निथळत ठेवावे. ३ वाटया चिरलेला गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे) ३ वाटया खवलेले ओले खोबरे ५-६ लवंगा ४-५ दालचिनीच्या काड्या ३-४ टेस्पून साजूक तुप २ टीस्पून वेलचीपूड सुकामेवा आपल्या आवडीप्रमाणे. Image removed. पाकृ: भांड्यात १ टेस्पून तुप गरम करुन लवंगा व दालचिनी परतून घेणे. Image removed. मग त्यात निथळत ठेवलेले तांदुळ घालून चांगले परतणे व पाणी घालून भात शिजवून घेणे. Image removed. शिजवलेला भात ताटात काढून गार होऊ दयावा. गुळ व ओले खोबरे एकत्र करुन घेणे. Image removed. जाड बुडाच्या भांड्यात २ टेस्पून तुप गरम करुन शिजवलेला भात व गुळ-खोबरे थोडे-थोडे करुन घालावे व हल़क्या हाताने एकत्र करावे. Image removed. एक- दोन वाफा आणाव्यात. त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड घालून, झाकून गुळ वितळेपर्यंत शिजवावे. Image removed. आवडत असल्यास वरून एक चमचा साजूक तुप सोडावे. गरमा-गरम खायला सुरुवात करावी. Image removed.

एकदम कातील दिसतोय

असा सुरेख भात चापून दुपारी वामकुक्शी म्हणजे नारळी पोर्णिमा अगादी अंगावर येते :)

आम्ही नारळीभातात केशरी रंग घालत नाही...केशरीभात किंवा साखरभात बनवताना त्यात केशर किंवा केशरी रंग घालतो.

निमिष ध.

ऑफिस मध्ये गेलो आणि तुमची पाककृती वाचली .. संध्याकाळी मित्राला फोन केला म्हणालो आज करूच नारळी भात.
मग काय मारली एशियन स्टोर ची चक्कर आणि समान आणले आणि हा पहा ...

From pics

तुम्ही तर लगेच करुन बघीतला नारळीभात, क्या बात आहे छानच दिसत आहे :)
धन्यवाद :)

प्राजु

मीही आज केला होता.
फोटो मस्त आले आहेत. :)

गणपा

मस्तच.
शेवटचा कधी चाखला होता आता आठवत पण नाही.

रेवती

मीही केला होता.
यावेळी तुझ्या पाकृत लिहिल्याप्रमाणे दालचिनी घातली होती.
थोड्या लवंगा तुपात तळून पूड करून घातल्या आणि थोड्या तशाच ठेवल्या.
बाकी कृती सेम आहे.
रंग बरोबर आलाय.
पराने हा भात कसा केला हे वाचायला आवडेल.
फारच गुणी आणि बल्लव मुलगा आहे हा!;)

चतुरंग

अनुमोदन दिल्या गेले आहे!!

-रंगा नारळीकर ;)