पाककृती

कोलंबीचे सुके,कोलंबीचे दबदबीत आणि तळलेले सौंदाळे.

Primary tabs

१)कोलंबीचे सुके. साहित्यः-१)कोलंबी. २)खवलेले खोबरे. ३)हळद. ४)तिखट. ५)मिठ. ६)बारीक चिरलेला कांदा. ७)२-३ आमसुले. ८)बटाट्याच्या लहान फोडी(optional) कृती :-प्रथम कोलंबी साफ करुन घ्यावी.साफ करतांना डोकी कोलंबीलाच ठेवावी.काढू नये.म्हणजे त्याचा वास सुक्याला चांगला येतो. Image removed. कोलंबी,चिरलेला कांदा,हळद्,तिखट,बटट्याच्या फोडी एकत्र करुन त्यात थोडे पाणी घालून शिजत ठेवावे. अर्धवट शिजले की त्यात मिठ घालावे.पूर्ण शिजल्यावर खाली काढण्यापूर्वी दोन मिनिटे आधी आमसुले व खोबरे घालावे. निट ढवळून खाली उतरवावे. Image removed. २)कोलंबीचे दबदबीत. साहित्यः-१)कोलंबी(वरिलप्रमाणे साफ केलेली) २)बारीक चिरलेला कांदा. ३)खवलेले खोबरे. ४)हळद. ५)तिखट. ६)मिठ. ७)८-९ काळी मिरी. ८)चिंच. ९)एक टेबलस्पून खोबरेल तेल्(फोडणीसाठी). १०)बटाट्याच्या बारीक फोडी(optional) कृती :-प्रथम एका भांड्यात खोबरेल तेल घालावे.तेल तापले की त्यात एक चमचा बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा लालसर झाला की त्यात कोलंबी घालावी.त्यातच उरलेला बारीक चिरलेला कांदा(एक चमचा वाटपात घालण्यासाठी बाजुला काढावा.)घालावा.तसेच हळद,तिखट,बटाट्याच्या फोडी व थोडे मिठ घालावे. चांगले ढवळून थोडे पाणी घालून शिजत ठेवावे.मिक्सरच्या भांड्यात खवलेले खोबरे,काळी मिरी,कांदा व चिंच थोडे पाणी घालून जाडसर वाटून घ्यावे.कोलंबी शिजली की हे वाटण त्यात घालावे.उरलेले चवीप्रमाणे मिठ घालावे.ढवळून चांगले उकळले की गॅस बंद करावा.चपाती,भाकरी कशाहीबरोबर हे दबदबीत मस्त लागते. Image removed. ३)तळलेले सौंदाळे. Image removed. साहित्यः-१)सौंदाळे. २)हळद. ३)तिखट. ४)तांदळाचा बारीक रवा(नसल्यास गव्हाचा रवा व थोडी कणिक) ५)मिठ. ६)तळण्यासाठी तेल. कृती :-सौंदाळे साफ करून त्याला मिठ लावून ठेवावे.बाकी माश्यांपेक्शा जरा जास्त वेळ मिठ लावून ठेवावे लागतात. Image removed. मासे धुवून त्याला हळद,तिखट व चिमुटभर मिठ लावावे.तांदळाच्या रव्यात घोळवून तेलात चुरचुरीत तळावे. Image removed. Image removed. Image removed.
गणपा

वाह सौंदाळे अतिशय चविष्ट असतात.
सध्या फोटोतुन दर्षन झालं हेच खुप आहे. :)

कच्ची कैरी

श्रावण महिन्यात काय छळ मांडला आहे !!मस्त आहे पाकृ.

आचारी

श्रावणमासि प्रत्येक मनासि
मट्ण - चिकन ..मासे दिसे चोहिकडे...
क्शणात बघुनि मासे....या तोन्डाला पाणि सुटे
सोबतिला हवे मद्याचे घुटे !!

आचारी

श्रावणमासि प्रत्येक मनासि
मट्ण - चिकन ..मासे दिसे चोहिकडे...
क्शणात बघुनि मासे....या तोन्डाला पाणि सुटे
सोबतिला हवे मद्याचे घुटे !!

स्पंदना

सौंदाळे म्हणजे कसले मासे ? काही वेगळ नाव आहे?

पाककृती आवडली.

साती

वा वा!
आत्ता फक्त १ आठवडा उरलाय हे सगळं खायला मिळायला.
चार दिवस रत्नागिरीत जाऊन फक्त आणि फक्त समुद्रातल्या भाज्या खाणार. :)