Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बहरणारा ऋतू संपत आलाय ...!!

प — प्रकाश१११, Sun, 08/14/2011 - 21:30
झाडांनी दखल घेतलीय बहरणारा ऋतू संपत आल्याची कशी जाणीव होते झाडाना ..? या बर्फाळ हवेची श्वास गुदमरू लागल्याची पाने पिवळी होऊ लागलीत आता कधीपण सुरु होईल पानगळ झाडांनी सर्व तयारी केलीय काळीज घट्ट करून पानाना निरोप देण्याची निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे कालच कितीतरी पाने गळून गेली नि आज सकाळी खच्चून सडा पडला पानांचा ... काष्ट शिल्प तशी झाडे ओकीबोकी ...!! त्यांच्या जाण्याच्या जाणीवेने दिशाही झाकोळून गेल्या ढगाचा कल्लोळ आभाळात आणि झाडे केविलवाणी ..... गळत्या पानाना कुशीत घेऊन फक्त मुकी मुकी झाडांनी मन घट्ट करून तयारी केलीय कधीपासून आपल्या पानाना निरोप देण्याची......! तो ह्या परदेशात बघत बसलाय पानगळ झाडांचे नग्नपण ओले ओले चिंब मन ..... त्याने घराच्या बाहेर रोखून ठेवलय बर्फाळ थंडीला आणि खोलीत टांगून ठेवलाय हवा तो ऋतू गरम .उबदार हवा तसा .......!

प्रतिक्रिया द्या
1369 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
शुचि Mon, 08/15/2011 - 03:39 नवीन
छान आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 08/16/2011 - 11:13 नवीन
कविता नेहमीप्रमाणे सुंदर.. पुन्हा निसर्ग .. आणि त्यात समरस होउन जाणारे मनाचे भावविश्व मस्त लिहिले आहे. पुन्हा एकदा, एक खरीखुरी कविता वाचल्याने खुप छान वाटले..
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 08/16/2011 - 15:32 नवीन
अमेझिंग!!! तुम्ही चित्रच उभे करता प्रकाश दा तुमच्या शब्दांनी. सुंदरच कविता..खूप खूप आवडली. विशेषतः << झाडांनी सर्व तयारी केलीय काळीज घट्ट करून पानाना निरोप देण्याची निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे कालच कितीतरी पाने गळून गेली नि आज सकाळी खच्चून सडा पडला पानांचा ... काष्ट शिल्प तशी झाडे ओकीबोकी ...!! >> - हे खूपच छान वाटले मला.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 08/17/2011 - 04:51 नवीन
प्रकाशजी बर्‍याच दिवसांनी आलात. आवडले काव्य.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा