Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंख मोकळे नभात..

प — प्राजु, Tue, 08/16/2011 - 18:45
एकदाच जन्म मिळतो, घेउ दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा गर्भ राहिला म्हणून, माय-बाप हर्षिले वाटले जसे अकाश बोट एक राहिले मास हे नऊ असे बहरु दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा जन्मण्याअधीच मी, 'गुन्हा'च जाहले कशी माय! सावली तुझीच, वाढते तुझ्या कुशी अंतरी तुझ्या निवांत, पाहते चराचरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा "मी न भार!' सांगतेय, मांडते अकांत मी 'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी?? मी तुझाच श्वास माय, दे तुझाच आसरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा मी नसेन तर जगात पाळणा हलेल का? माय अन बहीण.. कोण या जगी उरेल का? या इथे असेल फ़क्त हा पुरूष भिरभिरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा तोल ना ढळो कधी, निसर्ग हेच मागतो स्त्री विना उरेल पोकळी, असेच सांगतो येउद्या जगांत स्त्रीस, हीच वेळ सावरा!! पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा - प्राजु

प्रतिक्रिया द्या
2559 वाचन

💬 प्रतिसाद (13)
श
शैलेन्द्र Tue, 08/16/2011 - 18:55 नवीन
"तोल ना ढळो कधी, निसर्ग हेच मागतो स्त्री विना उरेल पोकळी, असेच सांगतो येउद्या जगांत स्त्रीस, हीच वेळ सावरा!! पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा" आवडली..
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 08/16/2011 - 19:07 नवीन
काव्य आवडले.
  • Log in or register to post comments
ज
जाई. Tue, 08/16/2011 - 20:47 नवीन
कविता छान जमलीय. शब्दरचना प्रभावी. सगळ्या भावना अचूक पकडल्यात.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 08/17/2011 - 03:26 नवीन
एक बाई एक अख्ख गाव वसवते अस म्ह्णतात. त्या मुळ बाईलाच नाकारुन अशी सारी गाव आपण उध्वस्त नाही का करत? मला आश्चर्य वाटत ते असा विचार करणार्‍या बायकांच. जी कोण सासु , अथवा स्वतः आई असेल तिला एकच प्रश्न विचारावासा वाटतो मला , मग बये तु कशाला अजुन जीव बाळगुन आहेस? तु पण मुलगीच ना? मग तु पहिला मर आणि मग या पोटातल्या बाळाला मार.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/17/2011 - 04:01 नवीन
शेवटचे कडवे माझ्या,असे अंतरात... शेवटचं कडवं जास्त आवडलं
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 08/17/2011 - 04:40 नवीन
छान कविता! आवडली.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 08/17/2011 - 10:43 नवीन
स्त्री-भ्रुण हत्येवर परखडपणे भाष्य करणारं तुमचं हे काव्य जबरदस्त आहे. __/\__
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 08/17/2011 - 11:00 नवीन
अप्रतिम लिहिले आहे
मी तुझाच श्वास माय, दे तुझाच आसरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा
क्लास ओळी.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 08/17/2011 - 14:56 नवीन
"मी न भार!' सांगतेय, मांडते आकांत मी 'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी?? "आ़कांत" शब्द अतिशय परीणामकारक योजला आहे. कविता आवडली हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Wed, 08/17/2011 - 15:53 नवीन
प्राजु, सगळी कडवी उच्च ! :) काव्य पोहोचले आणि त्यातली कळकळ्सुद्धा.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 08/18/2011 - 08:12 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 08/18/2011 - 13:44 नवीन
सर्वांचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/20/2011 - 08:28 नवीन
छान कविता... :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा