मयत (२) --- करीअर गायडंस वर्ग
💬 प्रतिसाद
(7)
व
विजुभाऊ
Mon, 05/26/2008 - 08:50
नवीन
'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता........... :))
तुमचा कन्दील काय कामाचा मग.कंदीलातली पावर कमी झालीकी काय?
अरे हो लोकांच्या सोयीसाठी खास अरण्यारुदन करणार्या लोकांचे खास पथक तयार केले जात आहे जालावर इतरत्र लिहिणार्या समिक्षकांच्या गायडन्स खाली. ते नसतील तर त्यांचे रे़कॉर्डेड ध्वनीफीती उपलब्ध आहेत.
बाकी तुमचा अनिभव दांडगा दिसतो हो.....अनुभवी लोक असले की सगळे कसे यथासांग होते
अवांतर : तुमच्या कंदीलाच्या दुकानाशेजारच्या इनोबाच्या मयताच्या सामानाच्या दुकानाशेजारच्या धमु च्या भजन मंडळाशेजारी मी " येथे कावळे भाड्याने मिळतील " अशी पाटी लावतोय. जरा प्रचार करा हो.
"तीन कावळे बूक करणारास एक कोलम तांदळाचा पिंड फ्री " अशी स्कीम पण राबतोय
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 05/26/2008 - 11:23
नवीन
बराच अभ्यास दिसतोय ह्या विषयातला. चांगले निरिक्षण आहे. पण अशा 'अतिउत्साही' माणसाला हेरून कामाला लावणारे महाभागही असतात. 'तुम्ही स्वतः काम न करता इतरांकडून कामे करून घ्यावीत' असा आपला सल्ला असला तरी इतरांची कोंडी करण्याच्या पद्धतीने तुमचीही कोंडी होऊ शकते. एखादा माणूस तुम्हालाच 'बळीचा बकरा' बनवतो. तुम्हाला ही एखादे काम 'नाही' म्हणणे शक्य नसते. असो.
आमच्या गावात असे एक प्रसिद्ध (ह्या कामासाठी) गृहस्थ होते. मैलोंनमैल दूरून गिधाडांना मुडद्याचा वास येतो तसे त्यांना गावात कोणाचा मृत्यू झाला की बातमी लागायची. लगेच स्वखर्चाने पावशेर 'देशी' मारून ते घटना स्थळी हजर व्हायचे. त्यांच्या आधी कोणी पोहोचून तिरडी बांधायला घेतली असेल तर, 'चला, चला, बाजूला व्हा. तुम्हाला काय येणार तिरडी बांधायला' असे म्हणून तिरडी 'ताब्यात' घ्यायचे. लग्न कार्यात भडजी जसे मुहूर्त जवळ आला की 'कन्येला घेऊन या' असे म्हणतात त्या प्रमाणे तिरडी बांधून झाली की 'प्रेत घेऊन या' असे फर्मवायचे. नातेवाईक प्रेत तिरडीवर ठेवू लागले की, 'थांबा. गाठी सोडल्या का?' असा मौलीक प्रश्न करायचे. श्रोत्यांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह दिसले की 'अरे! प्रेताच्या लेंघ्याच्या नाड्या सोडा. वस्त्राला कुठे गाठी असतील तर त्या सोडा. सगळ्यातून मुक्त करा त्याला' असा उपदेश करायचे. मधे मधे मोठ्या मुलाला सांत्वनपर बोलताना 'मी करतो सगळं, तू काही काळजी करू नकोस' असे सांगायचे. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ओळखिच्या अनोळखी माणसास ' काय आहे, ही आपली माणसं आहेत. आम्ही गावातले जुने. एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे. त्यामुळे मी काही जास्त चार्ज घेत नाही. '(म्हणजे 'मी चार्ज घेतो' हे सांगून टाकायचे).असे करत थेट स्मशानभूमी पर्यंत 'साथ' द्यायला पुढे. स्मशानात, ह्या पुर्वी येऊन इथे आणलेल्या प्रेतांच्या कथा मिठमसाला लावून उपस्थितांना ऐकवायच्या. कोणाची भूते झाली, कोणाला मुक्ती मिळाली वगैरे उपकथानके जोडायची. 'कवटी फुटल्याशिवाय कोणी घरी जाऊ नका' असा खणखणीत दम मृताच्या मोठ्या मुलादेखत सर्वांना द्यायचा, असा त्यांचा खाक्या. सर्व उरकल्यावर कोणी निकटचा नातेवाईक त्यांना त्याची फी विचारतो. त्यावर लाचार हसून 'द्या तुमच्या मर्जीनुसार' असे म्हणून लगेच त्याच्या पुढेच 'तुमच्याच गल्लीतल्या कुळकर्ण्यांनी त्यांचे आजोबा गेले तेव्हा ३०० दिले होते' अशी पुस्ती जोडून रक्कम सुचविण्याचे कामही ते करतात. पण ५०रु. पासून जे मिळेल ते स्विकारण्याचा व्यावसायिक लवचिकपणा त्यांच्यात आहे.
संध्याकाळी ते 'फुल्ल' असतात.
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Mon, 05/26/2008 - 12:24
नवीन
च्या मायला !!!
ऐकाव ते नवलच !!!!!!!
- Log in or register to post comments
ऋ
ऋचा
Mon, 05/26/2008 - 13:23
नवीन
'अजुन ५ मिनिट तिरडी अशीच ठेवली आसती तर तो मुडदा उठुन चालायला लागला असता.काय राव तुमची अक्कल...'
लै भारी राव!!!!
- Log in or register to post comments
म
मन
Mon, 05/26/2008 - 23:17
नवीन
लिवलत की राव याही येळेला.
आपलाच,
मनोबा
- Log in or register to post comments
म
मन
Mon, 05/26/2008 - 23:18
नवीन
लिवलत की राव याही येळेला.
आपलाच,
मनोबा
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 05/27/2008 - 12:12
नवीन
च्यामारी...
आम्बोळ्या, तू आता 'मृत्यू' हा विषय घेऊन पी.एच.डी. करच.
बाकी पेठकरकाकांशी सहमत...
तेव्हढं क्लासमध्ये शिकवून घ्या बुवा...समोरच्यानं आपल्या गळ्यात तंगडी अडकवली तर त्याला कसा उलटा करायचा ते :)
विजुभाऊ, वेलकम टू पार्टनरशीप :)
येऊद्या अजुनही...
स्वगतः त्या नचिकेतापेक्षा ह्या आम्बोळ्यालाच मृत्यू जास्त चांगला समजलेला दिसतोय. :?
- Log in or register to post comments